आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक फुटबॉल: स्पेन, नायजेरिया विजयी; अमेरिका-फ्रान्स लढत बरोबरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्तंबूल - स्पेन, नायजेरिया संघाने फिफा 20 वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजय मिळवून आगेकूच केली. स्पेन फुटबॉल संघाने रंगतदार लढतीत घानाचा 1-0 अशा फरकाने पराभव केला. तसेच नायजेरियाने क्युबावर 3-0 ने एकतर्फी विजय मिळवला. दुसरीकडे पोर्तुगाल व कोरिया रिपब्लिक यांच्यातील लढत बरोबरीत राहिली.
घानाविरुद्ध लढतीत रोड्रिगुईजने शानदार गोल करून स्पेनचा विजय निश्चित केला. त्याने सामन्याच्या 13 व्या मिनिटाला ही उल्लेखनीय कामगिरी केली. हा सामन्यातील एकमेव गोल ठरला. या गोलच्या बळावर स्पेनने शेवटच्या मिनिटापर्यंत लढतीत दबदबा कायम ठेवला.


नायजेरिया 3-0 ने विजयी
दुसरीकडे नायजेरियाच्या संघाने लढतीत 3-0 ने एकतर्फी विजय मिळवला. या संघाने क्युबावर मात केली. सामन्याच्या 19 व्या मिनिटाला उमरने नायजेरियाकडून पहिला गोल केला. त्यापाठोपाठ त्याने अवघ्या चार मिनिटांत संघाच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. यासह नायजेरिया संघाने सामन्याच्या मध्यंतरापूर्वी लढतीत सामन्यावर पकड घेतली. त्यानंतर दुस-या हाफमध्ये अजागुनने 67 व्या मिनिटाला गोल करून संघाचा 3-0 ने विजय निश्चित केला. पिछाडीवर पडलेल्या क्युबाने गोलचे खाते उघडण्यासाठी केलेला प्रयत्न शेवटपर्यंत यशस्वी ठरला नाही.
अमेरिकेने फ्रान्सला बरोबरीत रोखले
अमेरिकेच्या कुइवासने (85 मि.) गोल करून फ्रान्सला 1-1 ने बरोबरीत रोखले. फ्रान्सकडून सांगोनाने (48 मि.) एकमेव गोल केला. दुसरीकडे कोरिया रिपब्लिकने पोर्तुगालला 2-2 ने बरोबरीत रोखले. किमने (76 मि.) गोल करून कोरिया संघाचा पराभव टाळला. अलाडजे (3 मि.) व ब्रुमा (60 मि.) यांनी पोर्तुगालकडून गोल केले. कोरियासाठी रियू (45 मि.) आणि किमने गोल केले.