आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॉस एंजिल्स - भारतीय संघाला फिलाच्या वर्ल्ड फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अमित कुमार दहियाच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ स्पर्धेत सहभागी झाला होता. मात्र, निराशाजनक कामगिरीमुळे संघाला सहावे स्थान मिळवता आले.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेत्या अमित कुमारने पाचपैकी चार लढतीत बाजी मारून भारताचे सहावे स्थान निश्चित केले. संघातील इतर सर्व मल्लांनी निराशा केली. त्यामुळे पाचव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या टीमला मंगोलियाने 5-3 अशा फरकाने पराभूत केले. अमित कुमारने दमदार सुरुवात करताना मंगोलियाच्या नोमी बाटबोल्डला पराभूत केले. मात्र, बजरंग आणि रजनीशला विजयाचा हा कित्ता गिरवता आला नाही. त्यांनी सपशेल पराभव पत्करला.
दरम्यान, अमित धनकड आणि प्रवीण राणाने मिळवलेल्या विजयाच्या बळावर भारताने पुनरागमन केले. मात्र, त्यानंतर पवन आणि सत्यव्रतने दोन्ही सामने गमावले.
इराण पुन्हा विश्वविजेता
इराण संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना विश्वचषक आपल्या नावे केला. या टीमने अंतिम सामन्यात रशियाचा 6-2 अशा फरकाने पराभव केला. या स्पर्धेत एकूण दहा देशांचे मल्ल सहभागी झाले होते. तसेच अमेरिकेने तिसरे आणि युक्रेन संघाने चौथे स्थान पटकावले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.