आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Hocky League Final : India Germany Fights With Fifth Rank

वर्ल्ड हॉकी लीग फायनल: पाचव्या स्थानासाठी भारत-जर्मनीची झुंज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वर्ल्ड हॉकी लीग फायनलमध्ये यजमान भारतीय संघाने घरच्या मैदानावर सुमार कामगिरी केली. त्यामुळे यजमान संघ किताबाच्या स्पर्धेतून बाहेर पडला. आता स्पर्धेत पाचव्या स्थानासाठी भारतीय संघाला शुक्रवारी बलाढ्य जर्मनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागले.
आठ वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन भारत आणि जगातील नंबर वन जर्मनी यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेत यापूर्वी यजमान टीमने जर्मनी टीमचे विजयाचे मनसुबे उधळले होते. या दोन्ही संघांतील लढत 3-3 ने बरोबरीत राहिली होती. त्यामुळे या सामन्यात यजमान टीमला धूळ चारण्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन जर्मनीचा प्रयत्न असेल. जर्मनीला बरोबरीत रोखून भारताने उपांंत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाने पराभूत केलयाने भारताचे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे स्वप्न भंगले. आता स्पर्धेत पाचवे स्थान मिळवण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. या सामन्यातील पराभवासह भारताला आठव्या आणि शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागेल.