आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Hocky Legaue Round 2 : Sardar Singh Lead Male ,ritu Lead Women Team

हॉकी वर्ल्ड लीग राउंड-2 :सरदार सिंग कडे पुरुष, तर रितूकडे महिला संघाचे नेतृत्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एचआयएलमध्ये चांगली कामगिरी करत असलेल्या ड्रॅग फ्लिकर संदीप सिंगला हॉकी वर्ल्ड लीग राउंड-2 साठी निवडलेल्या भारतीय संघातून वगळण्यात आले. या स्पर्धेत सरदार सिंग 18 सदस्यीय भारताच्या पुरुष संघाचे नेतृत्व करणार आहे. हॉकी इंडिया निवड समितीचे सय्यद अली, प्रशिक्षक मायकल नोब्स यांनी मंगळवारी संघाची घोषणा केली. येत्या 18 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. भारतासह सहा संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी 11 फेब्रुवारीपासून दिल्ली येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सरावाला सुरुवात होत आहे. ड्रॅग फ्लिकर व्ही. आर. रघुनाथची उपकर्णधारपदी निवड झाली.
पुरुष संघ : पी. आर. श्रीजेश, पी. टी. राव, व्ही. आर. रघुनाथ, रुपिंदर पाल सिंग, हरबीर सिंग. वीरेंद्र लाक्रा, मनप्रीत सिंग, कोथाजित सिंग, सरदार सिंग (कर्णधार), गुरजिंदर सिंग. दानिश मुत्जबा, नितीन थिमैया, मनदीप सिंग, मालक सिंग, एस. व्ही. सुनील, चिंगलसेना सिंग, धरमवीर सिंग, गुरविंदर सिंग चांडी.

महिलांची मदार रितूवर
नवी दिल्ली।हॉकी वर्ल्ड लीग राउंड-2 मध्ये मिडफील्डर रितू राणी भारताच्या महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. ही स्पर्धा 18 ते 24 फेब्रुवारीदरम्यान, मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. मंगळवारी 18 सदस्यीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. चचंन देवीची संघाच्या उपकर्णधारपदी वर्णी लागली. फॉरवर्ड पूनम राणी, सौदर्या
येंदालासह नवज्योत कौरचे संघातील स्थान कायम आहे.