आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Junior Chess Starts On 5 October In Pune, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे पुण्यात ५ ऑक्टोबरपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - यंदाची वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप पुण्यात होणार आहे. येत्या ५ ऑक्टोबरला या स्पर्धेला प्रारंभ होइल. पुण्यातील हयात हॉटेल येथे होणा-या या स्पर्धेत ४५ देशांतील २०० हून अधिक बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ५ ते २० ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र डोंगरे व उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

खुल्या गटात १२५ हून अधिक खेळाडू सहभागी होत असून, ४५ देशांमधून ७५ महिला बुद्धिबळपटूंनीही स्पर्धेसाठी सहभाग निश्चित केला आहे. रशियाचे व्लादिमीर फेडोसिव्ह आणि अलेक्झांड्रा गोरयाच्किना यांना अनुक्रमे खुल्या आणि महिला गटांत अग्रमानांकित खेळाडू असतील. डब्ल्यूजेसी २०१४ मध्ये सहावे मानांकन प्राप्त नाशिकचा युवा बुद्धिबळपटू विदित गुजराथी आणि तृतीय मानांकित पद्मिनी राऊत हे अनुक्रमे खुल्या आणि महिला गटात भारतीय संघाची घरच्या मैदानावर धुरा सांभाळतील. या स्पर्धेत घरच्या मैदानावर भारताचे १११ खेळाडू नशिब आजमावतील. तसेच १०२ परदेशी खेळाडू सहभागी होणार असून, ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळवण्यात येणार असून रोज एक फेरी अशा १३ फे-या होणार आहेत.

खुल्या गटातील विजेते वर्ल्डकपसाठी पात्र
खुल्या आणि महिला गटात विजेतेपद मिळवणा-या बुद्धिबळपटूंना ग्रँडमास्टर आणि वुमन ग्रँड मास्टर किताब दिले जाणार असून हे विजेते आगामी वर्ल्ड कपसाठी पात्र ठरतील. सदर स्पर्धेतील विजेत्यांना सहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे. दोन्ही गटांतील सर्वोत्तम भारतीय बुद्धिबळपटूंना विशेष पारितोषिक म्हणून पुणे महापौर चषक देण्यात येईल.

४५ देशांचे खेळाडू
२०० खेळाडू सहभागी
७५ महिला खेळाडू
१११ भारतीय खेळाडू
१३ फे-यांमध्ये रंगणार स्पर्धा