आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOGRAPHY DAY: पाण्‍याखाली चॅम्पियन्‍सचा अनोखा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - ऑलिम्पिक चॅम्पियन जलतरणपटू मायकल फेल्‍प्‍स)
आज (19 ऑगस्‍ट) 'जागतिक छायाचित्र दिन' आहे. आजच्‍या दिनी फोटोग्राफीच्‍या नवीन ट्रेंडला सुरुवात झाली. आज आम्‍ही तुम्‍हाला क्रिडाजगतातील असे काही छायाचित्र दाखविणार आहोत जे पाहताच तुम्‍ही आवाक व्‍हाल. पहिल्‍या छायाचित्रामध्‍ये ऑलिम्पिक चॅम्पियन मायकल फेल्‍प्‍स पाण्‍यामध्‍ये आपल्‍या लॅपटॉपसोबत दिसत आहे.
का साजरा केला जातो छायाचित्र दिन
19 ऑगस्‍ट रोजी संपूर्ण विश्‍वामध्‍ये जागतिक छायाचित्रदिन साजरा केला जातो. 9 जानेवारी 1839 रोजी फोटोग्राफीमध्‍ये नवीन प्रॉसेस सुरु झाली. याचा शोध फ्रेंचचा छायाचित्रकार जोसेफ निफोरे आणि लुई डॅगुरे यांनी केली. त्‍यांच्‍या या शोधाला फ्रेंच अँकेडमी ऑफ सायन्‍सने मान्‍यता दिली.
19 ऑगस्‍ट 1939 ला झाली घोषणा
19 ऑगस्‍ट 1939 रोजी फ्रेंच सरकारने याची औपचारिक घोषणा केली. यामुळे फोटोग्राफी तंत्रामध्‍ये नवी क्रांती आली. या फोटोग्राफी तंत्राची सुरुवातीचे संस्‍मरण होण्‍यासाठी जागतिक छायाचित्रदिन साजरा केला जातो.
पुढील स्‍लाइडवर पाहा, जागतिक छायाचित्रदिनानिमित्‍त काही निवडक छायाचित्रे..