Home | Sports | Other Sports | world-series-boxing-in-mumbai

वर्ल्ड सीरीज बॉक्सिंग, मुंबईसह जगातल्या बारा संघांचा सहभाग

विनायक दळवी | Update - Aug 10, 2011, 01:45 AM IST

बॉक्सिंग खेळातील प्रतिष्ठेच्या वर्ल्ड सीरिज बॉक्सिंगचे आयोजन भारतात करण्यात येणार आहे.

  • world-series-boxing-in-mumbai

    मुंबई- क्रिकेटपाठोपाठ भारतात फॉर्म्युला वन मोटार शर्यती तसेच वर्ल्ड सीरीज बॉक्सिंग, व्यावसायिक गोल्फ, प्रोफेशनल टेनिस टूर अशा श्रीमंत खेळांचेदेखील वारे वाहायला लागले आहे. या खेळांपैकी एक असलेल्या बॉक्सिंग खेळातील प्रतिष्ठेच्या वर्ल्ड सीरिज बॉक्सिंगचे आयोजन भारतात करण्यात येणार आहे.
    मुंबईच्या ट्रान्स स्टॅडिया या कंपनीने या मालिकेत सहभागी होणाºया भारतीय संघाच्या मालकीचे हक्क मिळविले असून, वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनच्या अ‍ॅथलेटिक्स आणि यूथ कमिशनचे सचिव जय कवळी यांनी ही माहिती दिली. या सीरिजमध्ये उतरणारा भारतातील एकमेव संघ मुंबईचा असले हे निश्चित झाले आहे.
    लॉस एंजेलिस (अमेरिका), मयामी (अमेरिका), मिलान (इटली), पॅरिस (फ्रान्स), मॉस्को (रशिया), इस्तंबुल (तुर्की), स्टुटगार्ट (जर्मनी), बाकू (अझरबैजान), अस्ताना (कजाकस्थान), बीजिंग (चीन), पोहांग (दक्षिण कोरिया) आणि मुंबई (भारत) या जगातील १२ शहरांचे संघ उतरणार आहेत. यापैकी मुंबईच्या गटात अस्ताना अरलान्स, लॉस एंजेलिस मॅटाडोर, मिलानो थंडर, डायनामो मॉस्को, पोहांग पोसेडॉन्स हे संघ आहेत. मुंबईबाहेरच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण भारतात व्हावे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
    प्रत्येक संघ स्वगृही आणि प्रतिस्पर्ध्यांच्या शहरात एक लढत खेळणार. म्हणजे मुंबई संघाला पाच लढती भारतात खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यापैकी पहिली आणि शेवटची लढत महाराष्ट्रात असेल याची आम्ही निश्चिती केली आहे. यामुळे मुंबई आणि भारतातील बॉक्सर्सना जगातील नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.

Trending