आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामीरपूर - सततच्या अपयशामुळे आत्मविश्वास खचलेल्या टीम इंडियाला आता नव्या अभियानाला सुरुवात करायची आहे. बांगलादेशात सुरू झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सोमवारी श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात भारताला आपली दुबळी बाजू तपासण्याची आणि संघाचे संतुलन नीट करण्याची संधी असेल. श्रीलंकेविरुद्ध टी-20 लढतीत विजय मिळवून नव्या दमाने नवी सुरुवात करण्यास टीम इंडिया सज्ज आहे.
वर्ल्डकपमध्ये भारताचा अधिकृतरीत्या पहिला सामना 21 मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारताला दोन सराव सामन्यांत संघाचे संतुलन सुधारण्याची संधी असेल आणि 15 खेळाडू तपासता येतील. फलंदाजांकडून मोठ्या खेळीची आशा असेल, तर स्लॉग ओव्हरमध्ये कमी धावा देण्याचे आव्हान गोलदांजांसमोर असेल. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दौर्यानंतर आशिया चषकातही भारताला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. आता टी-20 मध्ये टीम इंडिया विजयी ट्रॅकवर परतेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
युवी, रोहित, रैनाकडे लक्ष
सराव सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग व सुरेश रैना यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. सततच्या अपयशामुळे युवराज आणि रैना यांनी एकदिवसीय संघातील आपले स्थान गमावले. आता टी-20 मध्ये चांगली कामगिरी करून पुन्हा वनडे संघात पुनरागमन करण्याचे त्यांचे लक्ष असेल. या तिघांच्या कामगिरीवर वर्ल्डकपमध्ये भारताचे भवितव्य अवलंबून असेल.
भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, रविचंद्रन अश्विन, वरुण अॅरोन, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, मो. शमी, मोहित शर्मा.
श्रीलंका
दिनेश चांदिमल (कर्णधार), दिलशान, रंगना हेराथ, कुमार संगकारा, जयवर्धने, नुवान कुलशेखरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँग्लॉ मॅथ्यूज, अजंता मेंडिस, कुशल परेरा, तिसरा परेरा, सी. प्रसन्ना, सचित्र सेनानायके, लाहिरू थिरिमाने.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.