आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-ऑस्ट्रेलियात आज संघर्ष; ग्रुपमध्ये टीम इंडियाचा अखेरचा सामन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - टी-20 वर्ल्डकपमध्ये गु्रुप 2 मध्ये रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगेल. टीम इंडियाने विश्वचषकात सलग तीन सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीला औपचारिक लढतीचे स्वरूप आले आहे. ग्रुपमध्ये भारताचा हा अखेरचा साखळी सामना आहे.

ऑस्ट्रेलियाचा दोन सामन्यांत पराभव झाला असून, एकही गुण न मिळवता कांगारू चौथ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलिया टीम सेमीफायनलच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाली असून, भारताविरुद्ध आणखी एका पराभवाने कांगारू पूर्णपणे स्पर्धेबाहेर होतील.

टीम इंडिया अव्वलस्थानी
नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टी-20 च्या क्रमवारीत भारताने 129 गुणांसह अव्वलस्थान गाठले. श्रीलंकेची 127 गुणांसह दुसर्‍या स्थानी घसरण झाली.

युवराजसिंग, धवनचा फॉर्म चिंतेचा विषय
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन व मधल्या फळीचा फलंदाज युवराज यांचा फॉर्म हरवला असून, या दोघांच्या तीन सामन्यातील सलगच्या अपयशामुळे धोनी चिंतेत सापडला आहे. सेमीफायनलपूर्वी दोघांचा फॉर्म परत यावा, यासाठी या दोघांना ही अखेरची संधी असेल. या सामन्यात टीम इंडिया राखीव खेळाडू अजिंक्य रहाणे, मोहित शर्मा आणि स्टुअर्ट बिन्नी यांना आजमावू शकते.