आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Womens Day Special News In Marathi, Divya Marathi

जागतिक महिला दिन विशेष : जग जिंकण्याचा रणरागिणींचा निर्धार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर आगामी काळात जग जिंकण्याचा निर्धार महिला खेळाडूंनी केला. या विश्वासासह आंतरराष्‍ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा मनोदय महिला दिनानिमित्त क्रीडा विश्वातील स्टार खेळाडूंनी दैनिक ‘दिव्य मराठी’शी केलेल्या खास चर्चेत व्यक्त केला.

इजिप्तमध्ये तिरंगा फडकवणार
येत्या सोमवारपासून इजिप्तमध्ये 10 हजार डॉलर्स बक्षिसाच्या महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून एकेरी व दुहेरीच्या किताबावर नाव कोरणार आहे. यासह बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान देशाचा तिरंगा फडकवणार असल्याचा निर्धार भारताची नंबर वन महिला युवा टेनिसपटू अंकिता रैनाने केला. गुजरातची युवा खेळाडू एकेरी व दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यानंतर अंकिता फ्रान्स येथील स्पर्धेत सहभागी होईल.