न्यूयॉर्क - अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित खेळाडूंच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. स्पर्धेच्या सातव्या दिवशी पाचवी मानांकित
मारिया शारापोवा आणि नववी मानांकित येलेना यांकोविचचा धक्कादायक पराभव झाला. दुसरीकडे कॅरोलीन वोज्नियाकी, सारा इराणी यांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत रॉजर फेडररने चौथ्या फेरीत प्रवेश केला.
महिला एकेरीत रविवारी चौथ्या फेरीचे सामने झाले. फ्रेंच ओपन चॅम्पियन मारिया शारापोवा आणि माजी नंबर वन यांकोविक यांना
आपल्यापेक्षा कमी क्रमवारीच्या खेळाडूंकडून पराभवाचा सामना करावा लागला. दहावी मानांकित डेन्मार्कच्या कॅरोलीन वोज्नियाकीने रशियाच्या शारापोवाला ६-४, २-६, ६-२ ने हरवले. सर्बियाच्या यांकोविचला बिगर मानांकित स्विस खेळाडू बेलिंडा बेनसिसने ७-६, ६-३ ने मात दिली. इटलीच्या सारा इराणीने क्रोएशियाच्या मिरजाना लुसी बरोनीला ६-३, २-६, ६-० ने मात दिली. चीनच्या शुआई पेंगने १४ वी मानांकित लुसी सॅफारोवाला ६-३, ६-४ ने हरवले.
फेडररचे शानदार पुनरागमन
पुरुषएकेरीत रविवारी तिसऱ्या फेरीचे सामने झाले. दुसरा मानंािकत रॉजर फेडररने स्पेनच्या मार्सेल ग्रेनोलर्सला ४-६, ६-१, ६-१, ६-१ ने मात दिली.
बोपन्ना-कॅटरिना उपांत्यपूर्व फेरीत
रोहनबोपन्नाने स्लोव्हेनियाच्या कॅटरिना सेबोत्निकसोबत मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या दोघांनी स्पेनची मॅडिना आफ्रिकेचा रॉबेन क्लासेन या जोडीला ६-३, ६-४ ने हरवले.
छायाचित्र - माजी नंबर वन मारिया शारापोवाला नमवल्यानंतर जल्लोष करताना कॅरोलीन वोज्नियाकी.