(फोटो - विजयानंरत आनंदी मुद्रेत डेन्मार्कची कॅरोलिन वोज्नियाकी)
न्यूयॉर्क - माजी विश्व चॅम्पियन रशियाच्या मारिया शारापोव्हाला US OPEN मधून बाहेर पडावे लागले. तिला सेरेनाची मैत्रिण कॅरोलिन वोज्नियाकीने गारद केले.
जागतिक अग्रनामांकित टेनिसपटू सरेना विल्यम्सची आणि वोज्नियाकीची घनिष्ट मैत्री आहे. वोज्नियाकीने शारापोव्हाला 6-4, 2-6, 6-2 अशा फरकाने पराभूत केले.
डबल फॉल्टमुळे सेरेना बाहेर
या वर्षीच्या किताबासाठी मजबूत दावेदार समजली जाणारी शारापोव्हा तिच्याच चुकींमुळे स्पर्धेतून बाहेर पडली. तिने सामन्यादरम्याने आठ डबल फॉल्ट आणि 43 अनफोर्स्ड चुका केल्या. त्यामुळेच तिच्या पदरी निराशा आली आणि तिला पराभवाचे तोंड पाहावे लागले.
पुढील स्लाइडवर पाहा, US OPEN ची काही खास निवडक छायाचित्रे..