आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wrestlar Yogeshwar Dutt With Dabang Khan, News In Matathi

PICS: हा आहे भारताचा \'दबंग\' DSP, दक्षिण कोरिया मध्‍ये रचला इतिहास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणा पोलिसमध्‍ये DSP पदावर नियुक्‍त असणा-या कुस्‍तीपटू योगेश्‍वर दत्‍तने इंचोयोन येथे सुरु असलेल्‍या आशियाई स्‍पर्धेत 'सुवर्ण पदक' जिंकून इतिहास घडवला आहे. आशियाई स्‍पर्धेमध्‍येध्ये इतिहास रचताना 28 वर्षांनंतर भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले. त्‍याने फायनलमध्ये तजाकिस्तानचा तगडा मल्ल जालिम खान युसुपोवला अत्यंत रोमांचक लढतीत 1-0 ने नमवले.
यामुळे म्‍हणतात दबंग
आशियाई स्‍पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा कुस्‍तीगीर योगेश्‍वर दत्‍त पेशाने पहिलवान आहे. हरियाणा शासनाने त्‍याची डीएसपी पदी नेमणूक केली आहे. लोक त्‍याला 'सिंघम' संबोधतात. परंतु योगेश्‍वरने स्‍वत: सांगितले आहे की, तो दबंग सलमान खानचा चाहता आहे.
हरियाणा पोलिसांनी त्‍याच्‍या खेळातील योगदानावरुन त्‍याला डीएसपी पदवी दिली. परंतु योगेश्‍वर स्वत:ला प्रथम खेळाडूच म्‍हणून घेतो.असे त्‍याने एका मुलाखतीदरम्‍यान सांगितले.
सिंघम आवडतो पण चाहता दबंगचा
योगेश्‍वरने सिंघमसारखे कोणतेच काम केले नसले तरी लोक त्‍याला सिंघम संबोधतात. एका खासगी कार्यक्रमामध्‍ये त्‍याला विचारणा केली असता, 'मला अजय देवगण आवडतो पण मी दंबगचा चाहता आहे.' असे उद्गार योगेश्‍वर दत्‍तने काढले.
वयाच्‍या 8 व्‍या वर्षी केली कुस्‍तीला सुरुवात
योगेश्‍वरने वयाच आठव्‍या वर्षांपासून कुस्‍तीला सुरुवात केली. त्‍याने पहिलवान बलराज यांच्‍याकडून प्रेरणा घेतली. रामफाल यांच्‍या मार्गदर्शनाखाली त्‍याने कुस्‍तीचे प्राथमिक धडे गिरवले.
योगेश्वरचे करियर
* लंदन 2012 ऑलिम्पिकमध्‍ये कांस्य पदक
* विश्‍व चॅम्पियनशिप कुस्‍ती-2006 मध्‍ये 60 किलो फ्रीस्टाइलप्रकारात पाचवे स्‍थान
* 2003 राष्‍ट्रकुल चॅम्पियनशिकप कुस्‍तीमध्‍ये सुवर्णपदक
* दोहा येथे झालेल्‍या 15व्‍या आशियाई स्‍पर्धेमध्‍ये कांस्य पदक
* राष्‍ट्रकुल स्‍पर्धा 2014 मध्‍ये सुवर्ण पदक
सुशील कुमारने दिल्‍या शुभेच्‍छा
योगेश्‍वर दत्‍त कुस्‍ती जिंकतो न जिंकतो तोच सुशीलने एक फोटो सोशल साइटवर शेअर करून योगेश्‍वर दत्‍तचे अभिनंदन केले होते. योगेश्वर दत्त आणि सुशील कुमार दोघेही चांगले मित्र आहेत. गुरु सतपाल यांच्‍याकडे ते प्रशिक्षण घेत आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, योगेश्‍वर दत्‍तचा दंबग लूकची छायाचित्रे...
हे सुध्‍दा वाचा