आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशी अंदाजात WWE च्या रिंगमध्ये उतरली इंडियन रेसलर- Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या देशी अंदाजात WWE च्या रिंगमध्ये उतरली कविता दलाल.... - Divya Marathi
या देशी अंदाजात WWE च्या रिंगमध्ये उतरली कविता दलाल....
स्पोर्ट्स डेस्क- अमेरिकेतील फ्लोरिडात 13 जुलै रोजी रात्री झालेल्या डब्लूडब्लूई माय यंग क्लासिक चॅम्पियनशिपमध्ये भारतीय रेसलर कविता दलाल एकदम देशी अंदाजात रिंगमध्ये उतरली. कविताने आखाड्यातील पैलवानाप्रमाणे आपल्या मांडीवर हात मारत दम दाखवला आणि एक हात उचलून प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. कविता येताच घोषणा करण्यात आली की, एकमेव इंडियन महिला रेसलर आहे, जी डब्लूडब्लूईमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. दुस-या राउंडमध्ये पोहचली कविता....
 
- 13 जुलै रोजी झालेल्या फाईटमध्ये कविताची कामगिरी चांगली राहिली. ती दुस-या राउंडमध्ये पोहचली आहे.  
- मात्र, डब्लूडब्लूईने अजून त्याचे निकाल घोषित केले नाहीत. मात्र, कविताने फाईटनंतर आपली आई आणि भावाला फोन करून माहिती दिली.
 
कोण आहे कविता दलाल-
 
- कविता दलाल खलीच्या जालंधर स्थित अॅकेडमीत नॅशनल रेसलर बुलबुलला सूट सलवार घालून पराभूत केल्याने प्रसिद्ध झाली होती.  
- यानंतर तिला बिग बॉसमध्ये निमंत्रण मिळाले होते. नॅशनल लेवलवर 9 वर्षे वेट लिफ्टिंगमध्ये गोल्ड जिंकणा-या कविताने जालंधर स्थित खलीच्या अॅकेडमीत ट्रेनिंग घेतले होते.  
- रोज 8 तास मेहनत करणारी कविता विवाहित आहे. घर आणि रेसलिंग दोन्ही कामे लिलया संभाळत आहे.  
- जींदमधील मालवी गावात राहणारी कविता पदवीपर्यंत शिकलेली आहे. यानंतर 2004 मध्ये लखनौमध्ये आपले रेसलिंगचे ट्रेनिंग सुरु केले. ट्रेनिंगदरम्यान तिने बीए पूर्ण केले. 
- शिक्षण आणि ट्रेनिंगनंतर 2008 मध्ये कविताने एक काँन्स्टेबल एसएसबीमध्ये नोकरी ज्वाईन केली. नोकरी लागल्यानंतर 2009 मध्ये कविताने बडौत येथे राहणा-या गौरवसोबत लग्न केले. गौरव सुद्धा एसएसबीमध्ये कॉंन्स्टेबल आहे आणि व्हालिबॉल खेळाडू आहे.  
- कविताने लग्नानंतरही रेसलिंगकडे दुर्लक्ष केले नाही. ती सातत्याने मेहनत घेत राहिली आणि पुढे जाण्याचे स्वप्न पाहत राहिली. अखेर तिने WWE पर्यंत मजल मारलीच. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कविता दलालची WWE रिंगमध्ये कशी झाली देशी अंदाजात एंट्री......
बातम्या आणखी आहेत...