आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य निकाली कुस्ती स्पर्धेत नरसिंग यादव तिसर्‍या फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - राज्य निकाली कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव (मुंबई) याने दुसर्‍या फेरीत जिंतूरच्या शेख तन्वीरला एक मिनिट 48 सेकंदांत चुरशीच्या सामन्यात अस्मान दाखवत, तर कोल्हापूरमधील मोतीबागच्या बाला रफिक याने हिंगोलीच्या संजय मांडगेला चीत करीत दुसर्‍या फेरीत यश मिळवले. दोघेही तिसर्‍या फेरीत पोहोचले. राज्यभरातून आलेल्या 350 पहिलवानांच्या कुस्त्यांना लाल मातीच्या आखाड्यावर शनिवारी दुपारी सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते स्पध्रेचे उद्घाटन झाले.