आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षी मलिक पैलवान सत्यव्रतसोबत करणार लग्न, योगेश्वरचाही साखरपुडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी आणि पैलवान सत्यव्रत एकाच तालमीत सराव करतात व हे दोघेही सत्यवान यांचे शिष्य आहेत. - Divya Marathi
साक्षी आणि पैलवान सत्यव्रत एकाच तालमीत सराव करतात व हे दोघेही सत्यवान यांचे शिष्य आहेत.
रोहतक- रिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकून इतिहास रचणारी रेसलर साक्षी मलिकने आपल्यापेक्षा एक वर्षाच्या लहान रेसलर सत्यव्रतसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघे अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतात. दुसरीकडे, रेसलर योगेश्वर दत्तने शनिवारी आपल्या काही खास मित्र आणि नातेवाईकांसमवेत सोनीपतच्या राहणा-या शीतलसोबत यंगेजमेंट केली. योगेश्वरच्या आईने ही मुलगी पसंत केली आहे. एकत्रच तालीम करतात साक्षी आणि सत्यव्रत...
- 24 वर्षाची साक्षी मलिकने 23 वर्षाच्या सत्यव्रतसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- सत्यव्रत कादियान रोहतकमध्ये तालीम चालवणारे पैलवान सत्यवान यांचा मुलगा आहे. तो 97 किलो वजनी गटात खेळतो.
- पैलवान सत्यवान हेच सत्यव्रत आणि साक्षी यांचे गुरु आहेत. सत्यवान यांना अर्जुन अवॉर्ड मिळाला आहे.
- नुकताच गुरगावमध्ये आयोजित केलेल्या भारत केसरी लढतीत सत्यव्रत तिस-या स्थानावर राहिला होता. त्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशाला सिल्वर मेडल जिंकून दिले होते.
- याशिवाय सत्यव्रतने भारत केसरी आणि चंबळ केसरी यासारखे किताब आपल्या नावावर केले आहेत.
- तर, साक्षीने रिओ ऑलिंपिकमध्ये 12 व्या दिवसी भारताचे मेडल खाते खोलले होते. ती महिला कुस्तीत भारताला ब्राँझ मेडल जिंकून देणारी पहिली खेळाडू ठरली आहे.
योगेश्वर जानेवारीत करणार लग्न-
- योगेश्वरचा भाऊ मुकेशने सांगितले की, या दोघांचे लग्न नव्या वर्षीत 14 जानेवारी रोजी होईल.
- रिओ ऑलिंपिकला जाण्याआधीच योगेश्वरच्या आईने आपली सून पसंत केली होती.
- योगेश्वरची होणारी बायको हरियाणातील सोनीपतमध्ये राहते. ती बीएची स्टुडंट आहे.
- शीतलचे वडील जयभगवान शर्मा बिजनेसमॅन आहेत. दोघांचे परिवार एकमेंकाना अनेक वर्षापासून ओळखतात.
- योगेश्वरने 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये 60 किलो वजनी गटात ब्राँझ मेडल जिंकले होते.
- तो रशियाच्या पैलवानाकडून हारला होता. त्याचे नाव डोपिंग टेस्टमध्ये आल्याने नुकतेच त्याला सिल्वर मिळणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र, आता गोल्ड जिंकणारा पैलवानही डोपिंगमध्ये अडकल्याचे समोर येत असल्याने योगेश्वरला गोल्ड मिळणार असल्याची चर्चा आहे.
नोव्हेंबरमध्ये लग्न करतेय गीता फोगाट-
- हरियाणाच्या या दोन पैलवानाशिवाय ऑलिंपियन गीता फोगाटने सुद्धा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ती यावर्षी नोव्हेंबरमध्ये पैलवान पवनसोबत लग्न करणार आहे.
- पवनने 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये 86 किलो वजनी गटात ब्राँझ मेडल जिंकले होते.
- दोघांची भेट सुमारे वर्षभरापूर्वी एका रेसलिंग चॅम्पियनशिपदरम्यान झाली होती. त्यावेळी पवनला गीता पसंत पडली होती.
- यानंतर दिल्लीतील नांगल ठाकरानमधील राहणा-या पवनने दोघांच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले होते.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित आणखी माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...