आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wrestling As It In Olympic, All Westling Lovers Happiness Celebrating

कुस्तीचे ऑलिम्पिकमधील स्थान कायम राहिल्याचे वृत्त धडकताच कुस्ती जगतात जल्लोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कुस्तीचे ऑलिम्पिकमधील स्थान कायम राहिल्याचे वृत्त धडकताच कुस्तीप्रेमींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पहिलवानांनी एकमेकांचे अभिनंदन केले. जे आखाडे पहिलवानांच्या आरोळ्यांनी घुमायचे, दुमदुमायचे तिथे पेढे वाटून जल्लोष साजरा झाला.


आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) ब्यूनर्स आयर्समधील 125 व्या सत्रात कुस्तीचे स्थान कायम ठेवण्यात आले. वा-यासारखी ही बातमी पसरली. कुस्ती ही भारताची शान. त्यामुळे साहजिकच समस्त भारतीय आनंदात बुडून गेले. केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्र सिंह यांनी या निर्णयाचे स्वागत केले. सिंह यांनी आयओसीचे अध्यक्ष जॅक्स रोगे यांना पत्र लिहून कुस्तीचे स्थान कायम ठेवण्याचा आग्रह केला होता. त्यासाठी क्रीडामंत्र्यांनी अनेक देशांना पत्रे लिहिली होती.


...अखेर यश मिळालेच
कुस्तीचे स्थान ऑलिम्पिकमध्ये कायम राहील याची आम्हाला पूर्ण खात्री होती. कुस्तीला वाचवण्यासाठी जगभरातून जे प्रयत्न झाले, त्यांना अखेर यश आले, अशी प्रतिक्रिया द्रोणाचार्य पुरस्कार विजेता सतपालने दिली.