आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची गाठ किरणशी, नेरमध्ये ५०० मल्ल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या ३० वर्षांपासून श्री हनुमान व्यायाम मंडळ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करते. यंदा नेर (पनवेल) येथे १७ फेब्रुवारीला कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ५०० पहिलवान लाल मातीतल्या कुस्तीत डावपेच रचणार आहेत. महाराष्ट्र केसरी झालेल्या विजय चौधरीला प्राचीन कुस्तीचा विजेता किरण भगत तगडे आव्हान देईल. यांच्यातील विजेत्याला अडीच लाख रोख आणि चांदीची गदा दिली जाईल. पुण्याचा योगेश पवार आणि कोल्हापूरचा मारुती जाधव एकमेकांशी भिडतील. ही कुस्ती दोन लाखांची होईल. विजेत्या मल्लांना एकूण २१ लाखांची रोख बक्षीस देण्यात येतील. या दंगलीत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मराठवाडा, मुंबईमधून आणि विभागातून मोठ्या संख्येने मल्ल सहभागी होणार आहेत.