आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुस्ती महासंघ आयओसीची मनधरणी करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ऑलिम्पिकमधील आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्याचा आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने विडा उचलला असून त्यासाठी कुस्ती या खेळात आकर्षक बदल करण्याचे त्यांनी ठरविले आहे. अमेरिका आणि रशिया हे दोन कट्टर प्रतिस्पर्धीदेखील कुस्तीचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी एकत्र आले असून, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष जॅक रॉग यांनी कुस्तीला जगभरातून मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहिल्यानंतर भेटण्याची तयारी दर्शवली आहे. इक्वेस्टेरियन, सिंक्रोनाईझ्ड स्विमिंग, ट्रॅम्पोलिन, पिंगपाँग, मॉडर्न पेन्टॅथलॉन या खेळांना वगळण्याची गरज होती, असेही मत व्यक्त होत आहे. कुस्ती स्वस्त आणि सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असणारा खेळ आहे. वरील महागडे खेळ वगळावे, अशी मागणी होत आहे.

5 खेळ अडचणीत ?
इक्वेस्टेरियन, सिंक्रोनाईझ्ड स्विमिंग, ट्रॅम्पोलिन, पिंगपाँग व मॉडर्न पेन्टॅथलॉन या पाच खेळांना वगळण्याची मागणी जोर धरत आहे.
इक्वेस्टेरियन- राजे आणि राण्या यांचा आश्रय लाभलेला हा खेळ खार्चिक, महागडा आहे.
सिंक्रोनाईझ्ड स्विमिंग- पाहायला आवडणारा हा खेळ अनेकांना ठाऊक नाही.
ट्रॅम्पोलिन- फारसे प्रेक्षक न लाभलेला आणि अनेक बदलांची गरज असलेला हा खेळ आहे.
पिंगपॉग- टेबल टेनिस हा खेळ कुस्तीच्या तुलनेत ऑ लिम्पिकमध्ये राहण्यायोग्य नसल्याचा अनेकांचा निर्वाळा.
मॉडर्न पेन्टॅथलॉन- हा खेळ खार्चिक आणि प्रेक्षकांप्रमाणे कमी स्पर्धक लाभलेला आहे.