आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wrestling Position Stable, International Olympic Committee Meeting Decided

कुस्तीचे स्थान कायम, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्युनस आयर्स - ऑलिम्पिक स्पर्धेतील पारंपरिक कुस्तीचे स्थान कायम राहणार असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत करण्यात आली. 2020 ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी कुस्तीने झालेल्या मतदानामध्ये स्क्वॅश आणि बेसबॉल/सॉफ्टबॉलला चीतपट केले.आयओसीच्या बैठकीत 95 पैकी सर्वाधिक 49 मताधिक्याने कुस्तीने आपले स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले. अशा प्रकारे आता 2020 आणि 2024 ऑलिम्पिकमधील कुस्तीच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) या वर्षी फेब्रुवारीत कुस्तीला बाहेर केले होते. त्यामुळे या कुस्तीच्या पाठिंब्यासाठी जगभरातील मल्लांनी दंड थोपटले होते. अखेर रविवारी आयओसीच्या बैठकीत कुस्तीच्या लोकप्रियतेची दखल घेण्यात आली. पुर्नविचार करताना आयओसीने कुस्तीच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब केला. यावेळी मतदानामध्ये कुस्तीचा दबदबा कायम राहिला. कुस्तीला 49, तर स्क्वॅशला 22 आणि बेसबॉल/सॉफ्टबॉलला 24 मते मिळाली.
दीपिकाचे स्वप्न भंगले
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कुस्तीचे ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित असल्याची घोषणा केली. यासह भारताची स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल, ज्योत्स्ना चिनप्पा, सौरव घोषाल यांचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले. ‘स्क्वॅश खेळाचा मोठय़ा प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे आमचा दावा मजबूत होता. तरीही आम्हाला निराशेला समोरे जावे लागले. आता आगामी काळात या खेळाच्या प्रवेशाबाबतीच्या निणर्याची प्रतीक्षा करावी लागेल, असे मत दीपिकाने मांडले.

पदकांचा दावा मजबूत
आयओसीच्या निर्णयामुळे आता ऑलिम्पिकमधील भारतीय मल्लांचा पदकाचा दावा मजबूत झाला आहे. तमाम चाहते आणि खेळाडूंनी दर्शवलेल्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले. भारतीय मल्ल आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकून आपला दबदबा कायम ठेवतील. योगेश्वर दत्त, ऑलिम्पिक पदक विजेता

युवा मल्लांना प्रोत्साहन
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कुस्तीच्या पुनरागमनाबाबत घेतलेला निर्णय हा जगभरातील युवा मल्लांना प्रोत्साहन देणार आहे. मागील फेब्रुवारीमध्ये कुस्ती बाहेर केल्याने युवांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र, आता नव्या उत्साह आणि उमेदीने कुस्तीपटू सरावाला प्रारंभ करतील. सुशीलकुमार, ऑलिम्पिक पदक विजेता

आयओसीच्या प्रत्येक सदस्यांचे मी आभार मानतो. त्यांनी ऑलिम्पिकमधील कुस्तीचे स्थान कायम ठेवण्याला जो पाठिंबा दिला. जगातील 300 वर्ष जुन्या पारंपारिक कुस्तीच्या चाहत्यांना व खेळाडूंसाठी हा निर्णय अधिकच महत्त्वाचा आहे.’ एन. लालोविच, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय संघटना

फ्लॅश बॅक
12 फेबुवारी : आयओसीने कुस्तीला ऑलिम्पिकमधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला.
31 मे : कुस्तीच्या पुनरागमनाची आशा कायम.ऑलिम्पिकमधील शॉर्टलिस्टमध्ये कुस्तीचा समावेश.
8 सप्टेंबर : कुस्तीच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब.

आयओसीच्या बैठकीत सहभागी झालेले जॅक्स रोंगेसह पदाधिकारी.

2020 ऑलिम्पिकचे टोकियोला यजमानपद
आगामी 2020 ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद टोकियोकडे सोपवण्यात आले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री दीड वाजता यजमानपदाची घोषणा केली. या स्पर्धेच्या आयोजनाच्या शर्यतीत जपानची राजधानी टोकियोने इस्तंबूल आणि माद्रिदला पिछाडीवर टाकून बाजी मारली. 2016 मधील ऑलिम्पिक स्पर्धा रिओ द जानेरिओ येथे होणार आहे. टोकियो दुसर्‍यांदा उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. यापूर्वी, 1964 मध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती.
बाप्पा पावले2 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
कुस्तीचे स्थान कायम
49
95
2020 आणि 2024 ऑलिम्पिकमध्ये कुस्ती होणार