आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Writing Letters To Anjali Was Difficult Than Batting: Sachin Tendulkar

अंजलीला पत्र लिहिणे फलंदाजीपेक्षा कठीण : सचिन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - अंजलीला पत्र लिहिणे मला सर्वाधिक कठीण काम वाटते. त्या तुलनेत फलंदाजी करणे सोपे. मी तिला पत्र लिहायचो आणि बर्‍याच वेळा तिला वाचूनही दाखवायचो. त्यावेळी मोबाइल नव्हते, म्हणून पत्र लिहून मन मोकळे करायचो..मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हे गुपित उघड केले.

एका कार्यक्रमानिमित्त चेन्नईला आला असता सचिनने या भावना व्यक्त केल्या. अंजली डॉक्टर असूनही ती इतर सामान्य डॉक्टरांप्रमाणे लिहित नाही. तिचे लिखाण, हस्ताक्षर सुंदर आहे. तिच्या लिखाणाला बघून कोणीही स्तुतीच करेल, असे सचिन म्हणाला. माझे वडील साहित्यिक होते. ते सुरुवातीपासून लिखाण करायचे. मात्र, मला त्यांच्यासारखे कधीच लिहिता आले नाही. माझ्या खेळाडू मित्रांत अनिल कुंबळेचे हस्ताक्षर सुंदर आहे, असे त्याने नमूद केले.

यादरम्यान आत्मकथा लिहित असल्याची कबुली सचिनने या वेळी दिली. सध्या याबाबत अधिक बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन, असे सचिन म्हणाला.