Home »Sports »Other Sports» Wta Dubai Open Tenis: Sania - Bethani In Final Round

डब्ल्यूटीए दुबई ओपन टेनिस : सानिया व बेथानी यांची अ‍ंतिम फेरीत प्रवेश

वृत्तसंस्था | Feb 23, 2013, 01:35 AM IST

  • डब्ल्यूटीए दुबई ओपन टेनिस : सानिया व बेथानी यांची अ‍ंतिम फेरीत प्रवेश

दुबई ; भारताची सानिया मिर्झा व अमेरिकेची बेथानी माटेक या जोडीने शुक्रवारी डब्ल्यूटीए दुबई ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. इंडो-अमेरिका या जोडीने महिला दुहेरीच्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाची एनस्तेसिया रोडियोनोवा- कारा ब्लॅकचा 6-2, 7-5 ने पराभव केला. सानिया-बेथानी या बिगरमानांकित जोडीने एक तास 20 मिनिटांत अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
दुस-या सेटमध्ये सानिया-बेथानीने ट्रायबे्रकरपर्यंत रंगलेली लढत सहजपणे जिंकून विजय निश्चित
केला. या जोडीचा फायनल सामना नुरिया लागोस्टेरा विवेस-झी चेंगे व नादिया पेत्रोवा-कॅटरिना यांच्यातील विजेत्यांसोबत होईल.

Next Article

Recommended