आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WTA Potugal Open Tennis News In Marathi, Sania Mirza, Divya Marathi

डब्ल्यूटीए पोर्तुगाल ओपन टेनिस: सानिया-कारा अंतिम फेरीत, सोमदेव देववर्मन पराभूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओयरस - भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची जोडीदार कारा ब्लॅकने या वर्षी आपला शानदार फॉर्म कायम राखत डब्ल्यूटीए पोर्तुगाल ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, पुरुष गटाच्या एकेरीत भारताच्या सोमदेव देववर्मनला पराभवाचा सामना करावा लागला.

सानिया-कारा यांची अमेरिकीची लिजेल ह्युबर आणि लिसा रेमंड या जोडीविरुद्ध लढत होती. दोन्ही जोड्यांदरम्यान सुमारे एक तास चौदा मिनिटांपर्यंत हा सामना रंगला. पहिला सेट 6-4 ने जिंकल्यानंतर सानिया-काराला दुस-या सेटमध्ये कडवे आव्हान मिळाले. लिजेल आणि लिसाने दुस-या सेटमध्ये सामन्यात परतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

मात्र, सानिया-काराने हा सेट 6-3 च्या फरकाने जिंकून सामनाही आपल्या ताब्यात घेतला. या विजयासोबतच त्यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी मागच्या आठवड्यात या जोडीने स्टटगार्डच्या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला होता मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. पुरुष गटात सोमदेव देववर्मनसमोर स्पर्धेचा अव्वल मानांकित खेळाडू टॉमस बर्डिचचे आव्हान होते. या स्पर्धेत भारताला सोमदेवकडून विजयाची अपेक्षा होती. मात्र, बर्डिचने केलेल्या पराभवामुळे प्रेक्षकांच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या. बर्डिचने हा सामना 6-3, 6-2 अशा फरकाने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला.