आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WWE Payback : The Shield & John Cena Vs. The Wyatt Family Fight Result In Marathi

PICS WWE : जॉन सीना ग्रुपने 'व्‍याट्स'च्‍या पैलवानांची केली 'धुलाई' !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - डब्ल्यूडब्ल्यूई (वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंट) च्‍या पेयबॅक स्‍पर्धेमध्‍ये एका लढतीमध्‍ये जॉन सीना, रॉमन रेंगिस आणि डीन एम्‍ब्रॉसने व्‍याटच्‍या पैलवानांची चांगलीच धूलाई केली. फाईटच्‍या सुरुवातीला व्‍याटने जॉन सीना ग्रुपला संपवण्‍याची भाषा केली होती मात्र त्‍याच्‍याच पैलवांनाची धुलाई होत असताना त्‍याचे सर्व फासे उलटे पडले असेच म्‍हणावे लागेल.
सुरुवातीला आक्रमक राहिलेल्‍या व्‍याट्च्‍या रॉवनने रिंगमध्‍ये आक्रमक सुरुवात केली. त्‍याने सीनाच्‍या एम्‍बॉसला चांगलेच पंच लगावले. एम्‍बॉस आपल्‍या साथीदाराकडे अडखळत जात होते.
ब्रेकनंतर जॉन सीनाची जबरदस्‍त एंट्री
रॉवनने सीनाच्‍या पैलवानांची चांगलीच पिटाई केल्‍याचे पाहताच सीना प्रचंड रागावला होता. त्‍याने रिंगमध्‍ये प्रवेश करताच रॉवन आणि हॉर्परची चांगलीच धूलाई केली. त्‍याच्‍या या जोरदार ठोश्‍यांमुळे एक पैलवान रिंगमधून पळून गेला.
ट्रिपल-एचची उपस्थिती
डब्ल्यूडब्ल्यूई चे सीईओ आणि माजी व्‍यावसायिक पैलवान ट्रिपल-एच उपस्थित होते. त्‍यांनी विजयानंतर जॉन सीना ग्रुपचे अभिनंदन केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, फाईटची छायाचित्रे..