आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE मध्ये सूट- सलवार घालून फाईट, या इंडियन रेसलरचा VIDEO घालतोय धुमाकूळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कविताने सूट सलवार घालत न्यूझीलंडची रेसलर डकोटा काईची जोरदार धुलाई केली. - Divya Marathi
कविताने सूट सलवार घालत न्यूझीलंडची रेसलर डकोटा काईची जोरदार धुलाई केली.
स्पोर्ट्स डेस्क- अमेरिकेतील फ्लोरिडात डब्लूडब्लूई माय यंग क्लासिक चॅम्पियनशिपमध्ये भारतीय रेसलर कवितादेवी दलाल एकदम देशी अंदाजात रिंग गाजवत आहे. कविताने सूट सलवार घालत न्यूझीलंडची रेसलर डकोटा काईची जोरदार धुलाई केली. कवितेच्या फाईटचा पहिला व्हिडिओ wwe ने आपल्या ऑफिशल वेबसाईटवर रिलीज केला आहे. ज्यात डकोटाची हालत तिने वाईट केल्याचे दिसते. कविता एकमेव इंडियन महिला रेसलर आहे, जी डब्लूडब्लूईमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. कोण आहे कविता दलाल...
 
- कविता दलाल खलीच्या जालंधर स्थित अॅकेडमीत नॅशनल रेसलर बुलबुलला सूट सलवार घालून पराभूत केल्याने प्रसिद्ध झाली होती. 
- यानंतर तिला बिग बॉसमध्ये निमंत्रण मिळाले होते. नॅशनल लेवलवर 9 वर्षे वेट लिफ्टिंगमध्ये गोल्ड जिंकणा-या कविताने जालंधर स्थित खलीच्या अॅकेडमीत ट्रेनिंग घेतले होते. 
- रोज 8 तास मेहनत करणारी कविता विवाहित आहे. घर आणि रेसलिंग दोन्ही कामे लिलया संभाळत आहे. 
- जींदमधील मालवी गावात राहणारी कविता पदवीपर्यंत शिकलेली आहे. यानंतर 2004 मध्ये लखनौमध्ये आपले रेसलिंगचे ट्रेनिंग सुरु केले. ट्रेनिंगदरम्यान तिने बीए पूर्ण केले. 
- शिक्षण आणि ट्रेनिंगनंतर 2008 मध्ये कविताने एक काँन्स्टेबल एसएसबीमध्ये नोकरी ज्वाईन केली. नोकरी लागल्यानंतर 2009 मध्ये कविताने बडौत येथे राहणा-या गौरवसोबत लग्न केले. गौरव सुद्धा एसएसबीमध्ये कॉंन्स्टेबल आहे आणि व्हालिबॉल खेळाडू आहे. 
- कविताने लग्नानंतरही रेसलिंगकडे दुर्लक्ष केले नाही. ती सातत्याने मेहनत घेत राहिली आणि पुढे जाण्याचे स्वप्न पाहत राहिली. अखेर तिने WWE पर्यंत मजल मारलीच.
 
पुढे स्लाईड्सद्वारे व्हिडिओ पाहा, कविता दलालने WWE रिंगमध्ये कशी केली देशी अंदाजात धुलाई.....
बातम्या आणखी आहेत...