आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • WWE World Heavyweight Championship 2014 Match, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : लेसनरने घेतला बदला, जॉन सीनाला केले चितपट! पाहा, छायाचित्रे.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - लढतीदरम्‍यान जॉन सीना आणि लेसरनर)
मियामी - जवळपास एक तास चाललेल्‍या आणि हृदयाची ठोके चुकविणा-या ब्रॉक लेसनर आणि जॉन साीना यांच्‍यातील लढत लेसनरने जिंकली. निमित्‍त होते वर्ल्‍ड हॅवीवेट चॅम्पियनशिप किताबाचे! उल्‍लेखनिय म्‍हणजे काही दिवसांपूर्वीच जॉन सीनाने प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्‍या स्‍टेडिअमध्‍ये लेसनरला चांगलेच धुतले होते. त्‍याचाच बदला लेसनरने लढत जिंकून घेतला. 2012 पासून सलग हॅवीवेट चॅम्पियन्‍स राहण्‍याचा किताब लेसनरने आपल्‍याकडे कायम ठेवला.

अशी झाली फाइट
प्रत्‍येक फाइटच्‍या वेळी रेसलर प्रेक्षकांशी संवाद साधतात. प्रतिस्‍पधकांचे उणे दुणे काढतात. परंतु यावेळी मात्र असे काहीच झाले नाही. रिंगमध्‍ये येताच एखाद्या वळू प्रमाणे दोघेही एकमेकांवर त्‍वेषाने तुटून पडले.
पाच मिनिटातच जॉन सीनाची बोबडी वळाली
लेसरन एवढा आक्रमक होता की, त्‍याने जॉन सीनाच्‍या पोटामध्‍ये दमदार ठोशे लगावले. त्‍यामुळे जॅान सीना अवघ्‍या पाचच मिनिटात अवघडला होता. आणि त्‍याच वेळेस सेठ रॉलिंग्‍जने रिगमध्‍ये प्रवेश केला.

सेठ रॉलिंग्‍सने केली दोघांची पिटाई
WWE च्‍या 'मनी इन द बँक' प्रकारात जॉन सीनाने रॉलिंग्‍सला पराभूत केले होते. अशावेळी रॉलिंग्‍सने संधी साधत जॉन सीना आणि ब्रॉक लेसनरची धुलाई केली.

'बॅली टू बॅक' मूव्‍हची धम्‍माल
ब्रॉक लेसनरने लढतीदरम्‍यान 20 पेक्षा जास्‍त वेळा जॅान सीनावर 'बॅली टू बॅक' प्रकारचा मुव्‍ह लावला. काही वेळा लेसनरने न थांबता सीनाला सलग मुव्‍ह लगावले. त्‍यामुळेच जॉन सीना पराभूत झाला.

पुढील स्‍लाइडवर पाहा, ब्रॉक सीना आणि लेसनर यांच्‍या लढतीतील छायाचित्रे...