Home | Sports | Other Sports | ycmou-degree-for-sportsman

क्रीडापटूंना पदवीधारक बनवण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे अभिनव पाऊल

प्रतिनिधी | Update - Aug 10, 2011, 01:56 AM IST

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने क्रीडापटूंसाठी पदवी आणि पदविका हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

  • ycmou-degree-for-sportsman

    नाशिक - क्रीडा क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य दाखवणारे क्रीडापटू अनेकदा शिक्षणात मागे पडतात किंवा त्यांचे शिक्षण अर्धवटच राहते. नोकरी मिळूनही पदवी नसल्याने अनेकदा त्यांना वरिष्ठ स्तरावरील नोक-यांपासून वंचित राहावे लागत असल्याने नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने क्रीडापटूंसाठी पदवी आणि पदविका हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
    महाराष्ट्राने विविध खेळामंध्ये आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण केले आहेत. अनेकदा त्यांना शिक्षणाअभावी नोकºया मिळत नाहीत किंवा मिळाल्या तरी पदवीअभावी वरिष्ठ स्तरावरील अधिकारी दर्जाच्या नोकरीपासून वंचित राहावे लागते. या पार्श्वभूमीवर मुक्त विद्यापीठाकडून पुढाकार घेऊन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांनी दिली. नूतन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत मुक्त विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

Trending