आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन डायमंड लीगमध्ये बोल्टचा डबल धमाका !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जमैकाचा स्टार अ‍ॅथलिट यसेन बोल्टने लंडन डायमंड लीगमध्ये डबल धमाका करताना दुस-यांदा सुवर्ण कामगिरी केली. शुक्रवारी 100 मीटरची शर्यत जिंकणा-या बोल्टने शनिवारी 4 गुणे 100 मीटर रिलेतही सुवर्ण यश मिळवले.


बोल्टच्या नेतृत्वाखाली जमैकाच्या खेळाडूंनी 37.75 सेकंदांचे रेकॉर्ड बनवताना सुवर्णपदक मिळवले. बोल्टशिवाय जमैकाच्या संघात मारियो फोरसिथे, कोल कॅमर बेली आणि वादेन वेयर यांचा समावेश होता. फ्रान्सच्या संघाने 38.45 सेकंदांसह रौप्यपदक, तर कॅनडाने 38.58 सेकंदांसह कांस्यपदक मिळवले. बोल्टने आपल्या दुहेरी यशाने मॉस्कोत होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आपण पूर्ण सज्ज असल्याचे दाखवले आहे.


डायमंड लीगचा दुसरा दिवस तसा इंग्लिश खेळाडूंनी गाजवला. इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी शनिवारी सुवर्णपदक जिंकले. मोहंमद फराहने 3000 मीटरची शर्यत जिंकून देशवासीयांना जल्लोषाची संधी दिली. त्याने सात मिनिटे 36.85 सेकंदात बाजी मारली. क्रिस्टिन ओहुरुओगोने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत यश मिळवले.
100 मी. शर्यतीनंतर 4 गुणे 100 मी. शर्यतीत जिंकले सुवर्ण
03 सुवर्णपदक दुस-या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी जिंकले