आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: अद्याप प्रतीक्षा शतकाची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयपीएल-6 मध्ये आतापर्यंत एकही शतक झालेले नाही. स्पर्धेच्या पहिल्या 18 सामन्यांत फक्त एक वेळा 200 चा टप्पा ओलांडला गेला. शिवाय फक्त दोन फलंदाज विराट कोहली आणि क्रिस गेल नाइंटीजपर्यंत पोहोचू शकले.

पहिले शतक मॅक्लुमचे
2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या स्पर्धेची सुरुवातच स्फोटक झाली. न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्लुमने कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना नाबाद 158 धावांची तुफानी खेळी केली होती. तो आयपीएलमध्ये अजूनही टॉप स्कोअरर आहे. पहिल्या स्पर्धेत 6 शतके ठोकण्यात आली, तर दुसºया स्पर्धेत दोन शतकांची नोंद झाली. तिस-या स्पर्धेत चार वेळा शतके झाली, तर 2011 आणि 2012 मध्ये प्रत्येकी 6 शतके झळकावण्यात आली.

शतक ठोकणारे सर्व विदेशी
2008 मध्ये सहा शतके झाली. ही सर्व शतके विदेशी खेळाडूंनी ठोकली. यात न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्लुम (158), अँड्र्यू सायमंड्स (117), मायकेल हसी (116), शॉन मार्श (115), अ‍ॅडम गिलख्रिस्ट (109) आणि सनथ जयसूर्या (114) यांचा समावेश आहे.

2011 मध्ये गेलची दोन शतके
2011 मध्ये गेलने दोन शतके (107) आणि नाबाद (102) ठोकली. याशिवाय पॉल वल्थाटी (नाबाद 120), वीरेंद्र सेहवाग (119) आणि सचिन तेंडुलकर (नाबाद 100) व गिलख्रिस्टने (106) पराक्रम केला.

या वेळीही गेल, कोहली चमकले
आयपीएल-6 मध्ये अद्याप एकही शतक झालेले नाही. विराट कोहलीने नाबाद 93, क्रिस गेलने नाबाद 92 धावा काढल्या. मायकेल हसीने नाबाद 86, दिनेश कार्तिकने 86 आणि क्रिस गेलने नाबाद 85 धावा काढल्या.

मनीष पांडे पहिला भारतीय
2009 मध्ये कर्नाटकच्या मनीष पांडेने नाबाद 114 धावा काढून आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू हा मान मिळवला होता.

आयपीएलमध्ये शतके
आयपीएल-1 (2008) : 6 शतके
आयपीएल- 2 (2009) : 2 शतके
आयपीएल- 3 (2010) : 4 शतके
आयपीएल- 4 (2011) : 6 शतके
आयपीएल- 5 (2012) : 6 शतके
आयपीएल- 6 (2013) : एकही शतक नाही. (14 एप्रिलपर्यंत)