आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yihan Wang, Tomy Surgito Champion In Singapur Open

सिंगापूर ओपनमध्ये यिहान वांग, टॉमी सुर्गितो विजेते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - यिहान वांग व टॉमी सुर्गितो सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन ठरले. या दोघांनी क्रमश: महिला व पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. गतविजेत्या बुनसाकला पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इंडोनेशियाच्या टॉमी सुर्गितोने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये बुनसाकचा पराभव केला. त्याने 20-22, 21-5, 21-17 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. यासह त्याने 69 मिनिटांत विजेतेपद आपल्या नावे केले.


महिला एकेरीत यिहान वांगने अव्वल मानांकित जुई रुई लीविरुद्धचा अंतिम सामना जिंकला. तिने सरळ दोन गेममध्ये 21-18, 21-12 ने सामन्यात विजय मिळवला. चीनच्या वांगने अवघ्या 39 मिनिटांत महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले.


चीनच्या क्वांग तियान व युनलेई झाओने महिला दुहेरीचा किताब जिंकला. या जोडीने मिसाकी मत्सुतोमो व अयाका ताकाहासीवर मात केली. चीनच्या या पाचव्या मानांकित जोडीने 48 मिनिटांत 21-19, 21-16 ने विजय मिळवला. दुसरीकडे मोहंमद अहसान व हेंद्रा सेतीवानने इंडोनेशियाला पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद मिळवून दिले. त्यांनी अंतिम सामन्यात अव्वल मानांकित सुंग ह्यून को व योंग ली यांचा 21-15, 21-18 ने पराभव केला.


तोंतोवी-लिलियानाचे यश
इंडोनेशियाचे तोंतोवी अहमद व लिलियाना मिश्र दुहेरीत चॅम्पियन ठरले. या तिस-या मानांकित जोडीने मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या येओन सेंगो यु व हयेन वोन इमोचा पराभव केला. इंडोनेशियाच्या जोडीने अवघ्या 35 मिनिटांत 21-12, 21-12 अशा फरकाने सामना आपल्या नावे केला.