आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क - विक्रमी ग्रँडस्लॅमचा बादशहा रॉजर फेडररविरुद्ध लढतीतील पराभवातून सावरलेल्या नोवाक योकोविकने मॅडिसन स्क्वेअर गार्डनवर विजय मिळवला. त्याने मैत्रीपूर्ण प्रदर्शनीय सामन्यात विम्बल्डन चॅम्पियन अँडी मरेचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेल्या योकोविकने रंगतदार लढतीत 6-3, 7-6 अशा फरकाने सामना जिंकला.
न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनवर प्रथमच टेनिस विश्वातील योकोविक आणि मरे हे दिग्गज खेळाडू समोरासमोर होते. गत आठवड्यात दुबई ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य लढतीत सर्बियाच्या नोवाक योकोविला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला स्विसच्या रॉजर फेडररने धूळ चारली. त्यामुळे त्याचे सत्रातील पहिला किताब जिंकण्याचे स्वप्नही भंगले. उपांत्य लढतीतील सनसनाटी विजयासह फेडररने दुबई ओपनचा किताब पटकावला.
याच पराभवाला दूर सारून सर्बियाच्या योकोविकने मरेविरुद्ध प्रदर्शनीय सामन्यात चमकदार खेळी केली. त्याने पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारली. मात्र, दुस-या सेटमध्ये लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन मरेने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे दोन्ही तुल्यबळ टेनिसपटूंमधील हा सेट ट्रायब्रेकरपर्यंत खेचला गेला. अखेर उल्लेखनीय कामगिरी करून योकोविकने दुस-या सेटमध्ये बाजी मारून इंग्लंडच्या अॅँडी मरेला 7-6 अशा फरकाने धुळ चारून विजयाची नोंद केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.