आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yogeshwar Dutt Won Gold Medal In Incheon Asian Games, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिक्‍स पॅक ते बाय शेप पर्यंत, छायाचित्रांमध्‍ये पाहा 'गोल्‍डन बॉय' योगेश्‍वर दत्‍तचे ट्रेनिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिक, राष्‍ट्रकुल स्‍पर्धा, वर्ल्‍ड कुस्‍ती चॅम्पियनशिप आणि आता आशियाई स्‍पर्धेमध्‍ये आपल्‍या पिळदार शरीरयष्‍टीचा उपयोग करुन भारताला पदक मिळवून देणारा योगेश्‍वर दत्‍त एक आगळा वेगळा आहे. योगेश्‍वर दत्‍त हरियाणा पोलिसमध्‍ये DSP पदावर नियुक्‍त आहे.
कुस्‍तीपटू योगेश्‍वर दत्‍तने 17व्या आशियाई स्‍पर्धेमध्‍येध्ये इतिहास रचताना 28 वर्षांनंतर भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले. त्‍याने फायनलमध्ये तजाकिस्तानचा तगडा मल्ल जालिम खान युसुपोवला अत्यंत रोमांचक लढतीत 1-0 ने नमवले.
सिक्‍स पॅकचा चांगला उपयोग
युवकांमध्‍ये सध्‍या सिक्स पॅकची चांगलीच क्रेझ तयार झाली आहे. सिक्‍स पॅक केवळ दिखाऊपणासाठी नाही तर त्‍याचा उपयोग कसा करावा याचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे योगेश्‍वर दत्‍त आहे. त्‍याने आपल्‍या बळाच्‍या आणि कौशल्‍याच्‍या सहाय्याने भारताला अनेक स्‍पर्धेंमधे पदकं मिळवून दिली आहेत.
योगेश्‍वरने 20 वर्षांनंतर दिले कुस्‍तीमध्‍ये 'सुवर्ण'
२८ वर्षांनंतर भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले. योगेश्वरने फायनलमध्ये तजाकिस्तानचा तगडा मल्ल जालिम खान युसुपोवला अत्यंत रोमांचक लढतीत १-० ने नमवले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश्वरने तिरंगा फडकावून स्टेडियमला फेरफटका मारला. योगेश्वरच्या आधी १९८६ च्या सेऊल एशियन गेम्समध्ये करतार सिंग यांनी सुवर्णपदक जिंकले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, योगेश्‍वर दत्‍तची वर्कआउटची छायाचित्रे...