मेलबर्न - यंदाच्या सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या रोमांचाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यात जगातील नंबर वन नोवाक योकोविक आणि स्विंस किंग रॉजर फेडरर टेनिस करिअरमध्ये या स्पर्धेचा पाचवा किताब पटकावण्यासाठी सज्ज आहेत. महिला एकेरीच्या जेतेपदासाठी अमेरिकेची सेरेना विल्यम्सवर सर्वांची नजर असेल.
सर्बियाच्या नोवाक योकोविक आणि फेडरर यांनी आतापर्यंत चार वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. वावरिंकासह डेव्हिड फेरर, जगातील माजी नंबर वन
राफेल नदाल आणि इंग्लंडचा अँडी मरेदेखील जेतेपदाच्या स्पर्धेत अाहे. यंदाच्या स्पर्धेत एकेरीत चांगलीच चुरस रंगण्याची शक्यता आहे.