आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मेलबर्न- जगातील नंबर वन खेळाडू नोवाक योकोविकने सलग तिस-यादा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला गटात व्हिक्टोरिया अजारेंका व चीनची ली नानेदेखील फायनलमधील प्रवेश निश्चित केला. अव्वल मानांकित मारिया शारापोवा स्पर्धेतून बाहेर पडली.
दोन वेळचा चॅम्पियन योकोविक सहा वर्षात चौथ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.गेल्या दोन वर्षात तो विजेता आहे. त्याच्यासाठी पुरुष गटाचा उपांत्य सामना सोपा राहिला. सर्बियाचा टेनिसपटू योकोविकने स्पेनच्या डेव्हिड फेररला सलग तीन सेटमध्ये 6-2, 6-2, 6-1 अशा फरकाने पराभूत केले. योकोविकने चौथ्या मानांकित फेररविरुद्ध सुरेख कामगिरी करत सामना जिंकला.
रॉड लेवर एरेना येथे झालेल्या लढतीत योकोविकने करिअरमधील सर्वोत्कृष्ट खेळी केली. त्याने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा व दुस-या सेटमध्ये एक वेळ फेररची सर्व्हिस ब्रेक केली. तिस-या व चौथ्या गेममध्ये त्याने स्पेनच्या खेळाडूची सर्व्हिस तोडून गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. सुरेख बॅडहॅँड क्रॉस फटके मारून त्याने विजयश्री मिळवला.
अजारेंका-लीना फायनल
जगातील नंबर वन व्हिक्टोरिया अजारेंका व चीनची ली ना यांच्यात महिला गटाच्या ऑस्ट्रेलियन ओपनचा फायनल मुकाबला होणार आहे. अजारेंकाने स्लोएनविरुद्धचा उपांत्य सामना जिंकला. दुसरीकडे आशियातील पहिली ग्रॅण्डस्लॅम विजेती ली नाने मारिया शारापोवावर मात केली.
भूपती, सानिया बाहेर
भारताचे टेनिसपटू महेश भूपती व सानिया मिर्झा स्पर्धेतून बाहेर पडले. भूपती-नादिया पेत्रोवा या पाचव्या मानांकित जोडीला ऑ स्ट्रेलियाच्या जर्मिला गाज्दोसोवा व मॅथ्यू एक्डनवर 6-3, 3-6, 13-11 ने मात केली. तसेच सानिया-बॉब ब्रायनला चेक गणराज्यच्या लुसी रादेका व फें्रटिसेक सेरमाकने 5-7, 4-6 ने पराभूत केले.
शारापोवाचे आव्हान संपुष्टात
रशियाची अव्वल खेळाडू मारिया शारापोवाचे गुरुवारी ऑ स्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तिला चीनची ली नाने सरळ दोन सेटमध्ये 6-2, 6-2 ने धूळ चारली. चीनच्या खेळाडूने एक तास 33 मिनिटे रंगलेल्या रोमांचक लढतीत विजयी पताका फडकवली. ली नाने पहिल्या सेटमध्ये तीन वेळा व दुसºया सेटमध्ये दोन वेळा रशियाच्या खेळाडूंची सर्व्हिस ब्रेक केली. 2011 मध्येही ली नाने ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठली होती.
स्लोएनचे स्वप्न भंगले
अमेरिकेची स्टार खेळाडू सेरेना विल्यम्सला घरी पाठवणाºया स्लोएन स्टीफंसकोचे पदकाचे स्वप्न भंगले. गुरुवारी महिला गटाच्या उपांत्य सामन्यात 19 वर्षीय स्लोएनला जगातील नंबर वन बेलारूसची खेळाडू व्हिक्टोरिया अजारेंकाने धूळ चारली. गतविजेत्या अजारेंकाने स्लोएनला सलग दोन सेटमध्ये 6-1, 6-4 ने पराभूत केले. दुखापतीने त्रस्त असलेल्या बेलारूसच्या खेळाडूने दुस-या सेटच्या नवव्या गेममध्ये पाच गुण गमावले. दरम्यान, दुखापतीमुळे तिने विश्रांती घेतली. त्यानंतर दमदार पुनरागमन करत अजारेंकाने दुसरा सेट सहजपणे जिंकून अंतिम फेरीत धडक मारली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.