आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे योकोविकने जिंकले अजिंक्यपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय - जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या नोवाक योकोविकने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचा किताब पटकावला. सर्बियाच्या खेळाडूने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जुआन मार्टिन डेल पेत्रोचा पराभव केला. त्याने 6-1, 3-6, 7-6 अशा फरकाने विजय मिळवला. अर्जेंटिनाच्या डेल पेत्रोने दुसरा सेट जिंकून लढतीत दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, योकोविकने तिसरा व निर्णायक सेट जिंकून अजिंक्यपद पटकावले.
अर्जेंटिनाच्या खेळाडूने उपांत्य सामन्यात जगातील नंबर वन राफेल नदालला धूळ चारली होती.