आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Cricketer Dies In Pakistan After Hit On Chest

छातीवर चेंडू लागल्याने पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील एका तरूण क्रिकेटपटूचे छातीवर चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे. जीशान मोहम्मद (वय 18) असे या खेळाडूचे नाव आहे. जीशान ओरंगी भागात सुरू असलेल्या एका क्लब सामन्यादरम्यान फलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्या छातीवर वेगात येणारा चेंडू लागला आणि तो मैदानातच कोसळला. जीशानला लगेचच जवळील एका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. स्थानिक पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "जीशानच्या नातेवाईकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. हा मृत्यू अपघाताने झाल्याने त्यांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही."
बाऊंसर लागल्याने झाला मृत्यू
काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा शेफील्ड शील्डच्या सामन्या दरम्यान गोलंदाज सीन एबोटच्या बाऊंसर डोक्यात लागल्याने मृत्यू झाला होता. यानंतर सिडनीमध्ये नॉर्थन डिस्ट्रीक्टसाठी ब्लॅकटाऊन विरोधात फलंदाजी करत असताना अजून एक खेळाडू डेनियल ह्यूजने कॅमरन न्यूपियरच्या बाऊंसरवर हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या हेलमेटच्या खाली गळ्याच्या मागील भागात लागला. त्यानंतर डेनियलला लगेचच रुग्णालयात भरती करण्यात आले.