आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Sarfaraz Powers RCB To 200 For Seven Vs Rajasthan Royals

IPL : मुंबईच्या 17 वर्षीय सरफराजसमोर कोहली नतमस्तक, 21 चेंडूत कुटल्या 45 धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरफराजला वाकून नमस्कार करताना विराट कोहली. - Divya Marathi
सरफराजला वाकून नमस्कार करताना विराट कोहली.
बुधवारी रात्री बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बेंगळुरू आणि राजस्थान यांच्यात बुधवारी 17 वर्षीय सरफाराज खानने तुफानी खेळी केली. मूळ मुंबईचा असलेल्या सरफराजला बेंगळुरूच्या टीमने करारबद्ध केले आहे. राजस्थान विरोधात त्याने 21 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर तो जेव्हा पॅव्हेलियनकडे परतत होता, त्यावेळी कोहलीनेदेखिल त्याला वाकून नमस्कार केला. विराटचा हा अंदाज अगदी पाहण्यासारखा होता. बेंगळुरूने 200 धावा केल्या. पण पावसामुळे हा सामना धुतला गेला.

पाठही थोपटली...
भरगच्च स्टेडियममध्ये विराटने आधी सरफराजला हाज जोडून नमस्कार केला. त्यानंतर या तरुण फलंदाजाची पाठ थोपटत त्याचे कौतुक करायलाही तो विसरला नाही. त्यावेळी सरफराजच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट जाणवत होता. इनिंगच्या अखेरच्या काही चेंडुंमध्ये सरफराजने 21 चेंडूंमध्ये 45 धावांची खेळी केली होती. त्याजोरावर बेंगळुरुने 200 धावा केल्या. सरफराजने त्याच्या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. अखेरच्या पाच ओव्हर्समध्ये संघाने 70 धावा केल्या.

वडिलांना मॅच पाहण्यासाठी जाणे शक्य होईना
वडिलांच्या जोरदार कामगिरीनंतर त्याचे वडील नौशाद म्हणाले की, मी घरी टिव्हीवर त्याची फलंदाजी पाहिली. मला फार आनंद झाला. ही त्याची मोठ्या प्लॅटफॉर्मवर मोठी खेळी आहे. मी सध्या लहान मुलगा बशीरला ट्रेनिंग देत आहे. तोही क्रिकेट खेळतो. त्याचा अभ्यास आणि ट्रेनिंग यामुळे मला सामने पाहायला स्टेडियममध्ये जाता येत नाही.

भारताच्या अंडर 19 वर्ल्ड कप टीममध्ये खेळला
सरफराज 2014 मध्ये भारताच्या अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा सदस्यही होता. तसेच रणजी ट्रॉफीत त्याने मुंबईकडून या सीझनमध्ये पहिला सामना खेळला, सरफराजचे वडील नौशाद हे क्रिकेट कोच आहेत. आजही ते बाईकवर आपल्या दोन्ही मुलांना घेऊन रौज कुर्ल्याहून आझाद मैदानावर येतात. आईपीएलच्या लिलावावेळी सरफराजने सांगितले होते की, बाइकवर दोन क्रिकेट बॅग घेऊन प्रवास करणे फार कठीण आणि धोक्याचे ठरायचे. पण रेल्वेने प्रवासही शक्य नव्हता. त्यामुळे वेळेवर पोहोचण्यासाठी बाइकवरच जावे लागायचे.
बॉल बाय बॉल धावा
ओव्हर रन बॉलर
13.6 0 स्टुअर्ट बिन्नी
14.2 1 प्रवीण तांबे
14.6 1 प्रवीण तांबे
15.1 1 जेम्स फॉकनर
15.4 4 जेम्स फॉकनर
15.5 1 जेम्स फॉकनर
16.1 4 शेन वॉटसन
16.2 4 शेन वॉटसन
16.3 (नो बॉल) 1 (दूसरी धाव घेताना कार्तिक बाद) शेन वॉटसन
16.4 1 शेन वॉटसन
16.6 1 शेन वॉटसन
17.1 4 प्रवीण तांबे
17.2 6 प्रवीण तांबे
17.3 1 प्रवीण तांबे
17.5 4 प्रवीण तांबे
17.6 2 प्रवीण तांबे
18.6 4 धवल कुलकर्णी
19.3 2 टीम साउदी
19.4 0 टीम साउदी
19.5 2 टीम साउदी
19.6 1 टीम साउदी
कोणत्या गोलंदाजाविरुद्ध किती धावा
बॉलर 4 6 रन बॉल स्ट्राइक रेट
टीम साउदी 0 0 5 4 125.00
धवल कुलकर्णी 1 0 4 1 400.00
जेम्स फॉकनर 1 0 6 3 200.00
शेन वॉटसन 2 0 11 5 220.00
प्रवीण तांबे 2 1 19 7 271.42
स्टुअर्ट बिन्नी 0 0 0 1 0.00
सरफराजचे क्रिकेट करिअर
सामने मॅच रन हाय स्कोर अॅव्हवरेज शतक अर्धशतक
फर्स्ट क्लास 3 95 52* 23.75 0 1
लिस्ट ए 5 58 41* 29.00 0 0
टी-20 9 82 36* 16.40 0 0
पुढील स्लाइडवर पाहा, विराटने कसे केले सरफराजचे स्वागत, आणि त्याच्या खेळीचे PHOTO