आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा खेळाडूंची वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध आजपासून कसोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हैसूर - फॉर्मात असलेल्या चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाला बुधवारपासून वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध चारदिवसीय सामन्यात खेळायचे आहे. भारतीय युवा संघाचा आत्मविश्वास बुलंदीवर असून हा सामना 25 ते 28 सप्टेंबरदरम्यान खेळवला जाईल.

सौराष्ट्रची रनमशीन पुजाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली फलंदाजी केली होती. ही लय तो या मालिकेतही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. आंतरराष्ट्रीय कसोटीत मोठे स्कोअर केल्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या पुजाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मागच्या सराव मालिकेत शतक ठोकले होते. यानंतर दुसर्‍या लढतीत त्याने 54 धावा काढल्या होत्या. युवा खेळाडू जीवनज्योत, के. एल. राहुल, रजत पालीवाल, हर्षद खडीवाले यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असेल.
भारत अ : चेतेश्वर पुजारा (कर्णधार), मनप्रीत जुनेजा, भार्गव, भट्ट, अशोक डिंडा, पारस डोगरा, जीवनज्योतसिंग, हर्षद खडीवाले, धवल कुलकर्णी, मो. शमी, रोहित मोटवाणी, रजत पालीवाल, ईश्वर पांडे, परवेज रसूल, लोकेश राहुल.
वेस्ट इंडीज अ : किर्क एडवर्ड्स, के. पॉवेल, क्रेग ब्रेथवेट, जोनाथन कार्टर, शेल्डन कॉटरेल, एम. कमिन्स, नरसिंह देवनारायण, फुडेडिन, हॅमिल्टन, डी. जॉन्सन, निकिता मिलर, अँश्ले नर्स, सी. वॉल्टन, वी. पेरमॉल, एस. शिलिंगफोर्ड.

पुजाराकडे संघाचे नेतृत्व
आतापर्यंत 13 कसोटीत 1180 धावा काढणार्‍या पुजाराला आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची चांगली संधी आहे. वेस्ट इंडीज अ संघाने वनडेत ज्याप्रमाणे चांगली कामगिरी केली, त्यावरून पुजाराच्या युवा संघाला सावध राहावे लागेल. वेस्ट इंडीज संघाला सहज घेण्याची चूक करता येणार नाही. अहमदाबादचा डावखुरा फलंदाज मनप्रीत जुनेजाचा सुद्धा आपला फॉर्म कायम ठेवण्यासाठी खेळेल. त्याने न्यूझीलंड अ संघाविरुद्ध दोन सामन्यात 236 धावा काढल्या होत्या.