आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा इंडियाच्या विजयात झोल पुन्हा चमकला !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डारविन - युवा इंडियाचा तडफदार कर्णधार विजय झोल पुन्हा एकदा तळपला आहे. 19 वर्षांखालील खेळाडूंच्या तिरंगी मालिकेत विजय झोल (64) आणि अखिल हिरवाडकर (60) यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाला 7 गड्यांनी पराभूत केले. या विजयासह भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.


भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 6 बाद 191 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 45.4 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 192 धावा काढून सामना आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियाकडून जेक डोरनने सर्वाधिक 41 धावा काढल्या. अखेरच्या काही षटकांत कॅमरून वेलेंटेने नाबाद 28 धावा काढल्या. सलामीवीर शॉटने 34 आणि टी. लीवरने 23 धावांचे योगदान दिले. भारताकडून आमीर गनीने 25 धावांत 3 विकेट घेतल्या. मोहंमद सैफने 16 धावांत एक आणि दीपक हुड्डाने 36 धावांत एकाला बाद केले. धावांचा पाठलाग करताना भारताकडून हिरवाडकर आणि ए. बैस (20) यांनी 6.6 षटकांत 38 धावांची सलामी दिली. बैस बाद झाल्यानंतर विजय झोल आणि हिरवाडकर यांनी दुस-या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली.


संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 6 बाद 191 (डोरन 41, वेलेंटे नाबाद 28, शॉर्ट 34, 3/25 आमीर गनी), भारत : 45.4 षटकांत 3 बाद 192 (अखिल हिरवाडकर 60, विजय झोल नाबाद 64, संजू सॅमसन नाबाद 24, मोहंमद सैफ नाबाद 21)