आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराजला आयपीएलमध्येही धक्का! बंगळुरू संघाने बाहेर केले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय संघाचा झंझावाती फलंदाज युवराज सिंगला एका आठवड्याच्या अंतराने दुसरा जबर धक्का बसला आहे. सातव्या सत्रातील सर्वात महागड्या युवीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बाहेर केले आहे. त्यामुळे त्याला आगामी सत्रात खेळण्यासाठी पुन्हा एकदा खेळाडूंच्या बाेली प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. युवी वर्ल्डकपसाठी जाहीर झालेल्या भारताच्या संभाव्य ३० खेळाडूंमध्येही स्थान देण्यात आले नाही. येत्या ८ एप्रिलपासून आठव्या सत्राच्या आयपीएलला प्रारंभ होणार आहे.

आयपीएलच्या सातव्या सत्रासाठी पहिला ट्रेडिंग विंडाे १२ डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आला होता. यात युवराज, दिनेश कार्तिकसह अनेक खेळाडूंना रिलीज झाल्याने बाेली प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल.

१४ कोटींचा युवी संघाच्या शाेधात
गत सत्रासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने युवराजवर १४ कोची बोली लावली होती. या १४ कोटींच्या युवीने तेव्हा बंगळुरूचे प्रतिनिधित्व करताना एकूण ३७६ धावा काढल्या. संघाकडून सर्वाधिक धावा काढणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. युवीसह दिनेश कार्तिकवर १२.५ कोटींची बोली लागली होती. मात्र, आता तो देखील संघाच्या शोधात आहे.

हे खेळाडू झाले रिलीज
युवराज सिंग (बंगळुरू), दिनेश कार्तिक (दिल्ली), चेतेश्वर पुजारा, मुरली कार्तिक, एल. बालाजी (पंजाब), माइक हसी, प्रवीण कुमार (मुंबई).