आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्करोगाविरुद्ध लढा जिंकण्यासाठी युवीच्या टिप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अप्रतिम खेळामुळे भारतीय क्रिकेट संघाचा ताईत बनलेल्या युवराजसिंगला यशाच्या सर्वोत्तम वळणावर कर्करोगासारख्या असाध्य रोगाचा सामना करावा लागला. परंतु जिद्द आणि प्रखर इच्छाशक्तीच्या बळावर त्याने या जीवघेण्या रोगावरही मात केली. स्वत: या रोगाच्या कठीण परिस्थितीतून सावरलेला युवराज सध्या लोकांना कर्करोगाविरोधातील लढा जिंकण्यासाठी शिकवण देतोय.


कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या जीवनात उत्साह तयार करणे हे त्याचे सध्या ध्येय आहे. नुकतेच त्याला ‘आजतक केअर अवॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. कर्करोगाचे नाव ऐकूनच मनात भीती निर्माण होते. त्याच क्षणी ते जगण्याची आशा सोडून देतात; परंतु त्यांच्या मनातून ही भीती दूर करण्याची माझी इच्छा आहे. यामुळे त्यांच्यामध्ये कर्करोगाशी लढण्याची क्षमता उत्पन होईल, असे युवीने म्हटले.


भावनात्मक पाठिंब्यामुळे
वाढली हिंमत
मागील वर्षी जेव्हा अमेरिकेत माझ्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते तेव्हा सुरुवातीस मी प्रचंड घाबरलो होतो; परंतु नंतर मी याच्याशी लढा देण्याचा निर्धार केला. या वेळी माझी आई, कुटुंबातील अन्य सदस्य आणि मित्रांचा भावनात्मक पाठिंबा मिळाला. त्यांच्या या पाठिंब्यामुळे माझ्यात एक नवीन प्रकारची ताकद तयार झाली, असे युवराज म्हणाला. कर्करोगाच्या विरोधात तो देशभरात ‘युवीकॅन’ अभियान राबवत आहे.


‘युवीकॅन’च्या माध्यमातून
केला मदतीचा प्रयत्न

अमेरिकेतून उपचार घेऊन परतल्यानंतर मी अनेक कर्करोग पीडितांना भेटलो; परंतु हे लोक त्यांचा आजार सांगण्यासही घाबरतात. यादरम्यान कर्करोगाने ग्रस्त मुलाच्या आईला मी भेटलो. लोकांनी या आजाराविषयी माहिती द्यावी, जेणेकरून त्यावर तत्काळ उपचार करता यावेत, अशी आमची इच्छा आहे. कर्करोगाचे उपचार महाग आहेत, हे मला माहीत आहे. त्यामुळेच युवीकॅनच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो.


शुभेच्छा संदेशामुळे झालो भावुक
मागील वर्षी उपचारावेळी चंदिगडमध्ये एका पोस्टरवर माझ्यासाठी शुभेच्छा संदेश लिहिले जात होते. तेव्हा तिथे व्हीलचेअर बसलेल्या एका व्यक्तीने त्या पोस्टरवर मी लवकर बरा होण्यासाठी संदेश लिहिला. हे छायाचित्र मी एका वर्तमानपत्रात बघितले तेव्हा खूप भावुक झालो होतो.