आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj Dedicates Match winning Knock To Temdulkar

सचिनचे पाय धरुन ड्रेसिंग रुमममध्‍येच थांबवून ठेवणार; युवराज झाला भावूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट- भारतीय क्रिकेट संघाने ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध एकमेव टी-20 सामन्‍यात भारताने दणदणीत विजय मिळविला. या सामन्‍याचा हिरो ठरला युवराजसिंग. युवराजने संघात पुनरागमन करताना ऑस्‍ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. युवराजने 35 चेंडूत नाबाद 77 धावा ठोकून भारताचा विजय साकारला. हा विजय आणि ही खेळी युवराजने सचिन तेंडुलकरला अर्पण केली आहे. सचिनने काल निवृत्ती घेणार असल्‍याची घोषणा केली होती. एकीकडे सामना जिंकल्‍याचा आनंद आणि दुसरीकडे सचिनची निवृत्ती, यामुळे संमिश्र भावना असल्‍याचे युवराज सामन्‍यानंतर म्‍हणाला.

युवराजने सांगितले, मी आनंदी आहे की दुःखी, हे सांगू शकत नाही. चांगला खेळलो याचा आनंद आहे. तर, सचिन निवृ्त्त होतोय, यामुळे दुःख आहे. निश्चितच मी माझी खेळी सचिनला अर्पण करीन. हे मी त्‍याला दूरध्‍वनीवरुनही सांगीन. याशिवाय मी माझ्या आईलाही खेळी अर्पण करतो. कारण, माझ्या पुनरागमनासाठी तिने खूप प्रार्थना केली होती. दररोज ती माझ्यासाठी प्रार्थना करते. मी ज्या पद्धतीने खेळलो, त्‍याचा अर्थातच आनंद आहे. गेल्‍या काही दोन महिन्‍यात मी वेस्‍ट इंडिज अ आणि चॅलेंजर चषक स्‍पर्धेत चांगला खेळत होतो. त्‍यामुळे समाधान आहे.

आणखी काय म्‍हणाला युवराज सचिनबद्दल... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...