आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- टीम इंडियाचा स्टार फलंदाज युवराज सिंग आगामी टी-20 विश्वचषकात खेळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या निवड समितीचे प्रमूख के.श्रीकांत यांनीच युवराजच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होणा-या श्रीलंका दौ-यासाठी संघाची घोषणा केल्यानंतर श्रीकांत यांनी पत्रकारांशी युवराज सिंगच्या पुनरागमनाबाबत चर्चा केली. सप्टेंबर महिन्यात होणा-या टी-20 विश्वचषकासाठी पुढच्या महिन्यात संघ निवड घोषित केली जाईल. युवराजने सराव सुरू केला ही चांगली बाब असल्याचे श्रीकांत यांनी म्हटले.
ज्या खेळाडूने विश्वचषक जिकण्यात महत्वाची भूमिका निभावली त्याला संघात असले पाहिजे. आमच्याकडे अजून खूप वेळ आहे. पुढच्या महिन्यात संघ निवड केली जाईल, असेही श्रीकांत यावेळी म्हणाले. नुकताच युवराजने बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अॅकेडमीमध्ये सरावास सुरूवात केला आहे. काही महिन्यांपूर्वीच युवराज अमेरिकेत कॅन्सरवर उपचार करून परतला आहे. टीम इंडियाने जिंकलेल्या विश्वचषकात युवराज सिंगला मालिकावीराचा बहुमान मिळाला होता. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 विश्वचषकात त्याने चमकदार खेळी केली होती.
फक्त 15 मिनिटांचा सराव... आणि थकला युवराज
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.