आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराजकडे भारत अ संघाचे नेतृत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दीर्घकाळापासून टीम इंडियामधून बाहेर असलेल्या वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि जहीर खानला वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यासाठी भारत अ संघात स्थान मिळाले आहे. हे तिघे या महिन्याच्या शेवटी वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध दुसरा आणि तिसरा चारदिवसीय सामना खेळणार आहेत. युवराजसिंगच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ विंडीजविरुद्ध तीन वनडे सामने खेळणार आहे.

गतवर्षी गंभीर आणि जहीरला टीम इंडियामधून वगळण्यात आले. सेहवाग भारताकडून या वर्षीच्या मार्चमध्ये शेवटचा सामना खेळला होता. नव्या सत्राच्या सुरुवातीपूर्वी पुनरागमनाने या तिन्ही दिग्गजांना टीममधील मार्ग सोपा केला आहे. याशिवाय सात वर्षांनंतर मोहंमद कैफला पुनरागमनाची संधी मिळाली. ऑलराउंडर युवराजसिंगकडे वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध भारतीय अ संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. चॅम्पियन्स लीग टी-20 मध्ये सहभागी मुरली विजय, सुरेश रैना, रोहित शर्मा, अंबाती रायडू, शिखर धवन, साहाला भारत अ संघात स्थान मिळाले नाही. हे खेळाडू स्पर्धेत चॅम्पियन्स लीग टीमकडून खेळतील.

पहिल्या चारदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : चेतेश्वर पुजारा (कर्णधार), जीवनज्योत, लोकेश राहुल, मनप्रीत जुनेजा, रजत पालीवाल, हर्षद खडीवाले, परवेज रसूल, भार्गव भट्ट, ईश्वर पांडे, मोहंमद शमी, अशोक डिंडा, रोहित मोटवाणी, धवल कुलकर्णी, पारस डोगरा.

दुसर्‍या व तिसर्‍या चारदिवसीय सामन्यांसाठी भारत अ संघ : चेतेश्वर पुजारा (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, शेल्डन जॅक्सन, अभिषेक नायर, उदय कौल, परवेज रसूल, भार्गव भट्ट, धवल कुलकर्णी, जहीर खान, ईश्वर पांडे, मोहंमद शमी, मोहंमद कैफ.

तीन वनडे व एक टी-20 सामन्यासाठी भारत अ संघ : युवराजसिंग (कर्णधार), उन्मुक्त चंद, रॉबिन उथप्पा, बाबा अपराजित, केदार जाधव, नमन ओझा (यष्टीरक्षक), युसूफ पठाण, इरफान पठाण, जयदेव उनाडकत, प्रवीणकुमार, सुमीत नारवाल, शाहबाज नदीम, मनदीप सिंग, राहुल शर्मा.