आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : सुमार कामगिरीमुळे युवीचे पुणे टीममधील स्थान धोक्यात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सुमार कामगिरीमुळे युवराजसिंग पुढच्या आयपीएल सत्रात पुणे वॉरियर्स टीममधून बाहेर होऊ शकतो, असे भाकीत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डीन जोन्सने वर्तवले आहे. आयपीएल-6 मध्ये त्याला प्रतिभेनुसार कामगिरी करता आली नाही. त्याने आतापर्यंत दहा सामन्यांत निराशाजनक कामगिरी केली.

ऑलराउंडर युवीने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये निराशा केली आहे. त्याने स्पर्धेतून बाहेर झालेल्या पुणे टीमकडून 10 सामन्यांत 6.86 च्या सरासरीने अवघ्या 172 धावा काढल्या आहेत. यामध्ये त्याच्या सर्वाधिक 34 धावांचा समावेश आहे.

आयपीएलच्या आगामी 2014 मधील सातव्या सत्रात होणा-या बोली प्रक्रियेत सर्व फ्रँचायजी दोन किंवा तीन भारतीय आणि तितकेच विदेशी खेळाडू आपल्या टीममध्ये सहभागी करू शकतील. जोन्स यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुणे वॉरियर्स टीममध्ये एकच खेळाडू ठेवू शकते. अशात युवीचा पुणे टीमसोबतचा करार संपुष्टात येऊ शकतो.

माजी विकेटकीपर फारुख इंजिनिअरच्या मते, कर्णधारपद हिसकावून घेतल्यामुळे युवराजसिंग नाराज आहे. या कारणामुळे तो निराशाजनक कामगिरी करत आहे. पुणे संघाचे नेतृत्व यापूर्वी मॅथ्यूजकडे, त्यानंतर रॉस टेलर आणि अ‍ॅरोन फिंचकडे सोपवण्यात आले. मात्र युवीकडे कधीही नेतृत्व सोपवण्यात आले नाही.

एकही अर्धशतक नाही : आयपीएलच्या दहा सामन्यांत एकही अर्धशतक झळकावले नाही. सामन्यात 34 हा वैयक्तिक सर्वात मोठा स्कोअर आहे. त्याने पंजाबविरुद्ध सामन्यात ही कामगिरी केली होती. याशिवाय त्याने 31, 28*, 24, 16, 15, 5, 2 आणि 1 धावा काढल्या आहेत.