आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yuvraj Singh Says I Am Cancer Survivor And No Problem To Marry A Survivor Girl

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवी म्हणाला, Cancer Survivor तरुणीशी विवाह करण्यास मला काही अडचण नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचकुला - कँसर पीडित तरुणीबरोबर (यशस्वी उपचार सुरू असलेली ) विवाह करण्यात आपल्याला काहीही अडचण नसल्याचे युवराज सिंगने स्पष्ट केले आहे. एका कार्यक्रमात कँसर पीडितांच्या प्रश्नाचे उत्तर देताना युवराजने हे वक्तव्य केले आहे.
फोटो - वर्ल्ड कप-2011 च्या विजयी चषकासह युवराज सिंह.
असा होता गुरजसजित सिंगचा प्रश्न
पटियालाचा गुरजसजित सिंह याने युवीला विचारले की, बहुधा तुला माझा प्रश्न आवडेल. मला असे विचारायचे आहे की, तु कँसर सरव्हायवर मुलीशी विवाह करशील काय़ त्यावर युवराज म्हणाला, का नाही. मला त्यात काहीही अडचण नाही. मीही एक कँसर सरव्हायवर आहे. त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नाही. हे ऐकताच हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. गुरजसजित त्याची बहीण मनदीपबरोबर कार्यक्रमात आला होता. मनदीप ब्रेस्ट कँसर सरव्हायवर आहे.
ब्रेस्ट कँसरमुळे घटस्फोट
मनदीपने यावेळी सांगितले की, कँसरमुळे तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला. पण कुटुंबीयांनी दिलेल्या हिमतीमुळे तिने कँसरवर मात केली आहे. त्यावर युवी म्हणाला, बरे झाले तो नवरा तुझ्या लायकीचा नव्हता. वाईट काळातच लोकांची खरी ओळख पटते.

कँसर म्हणजे मृत्यू नाही
युवराजने आजारी असलेल्या दिवसांबाबत आठवणी सांगिल्या. कुटुंबीय आणि मित्रांशिवाय अनिक कुंबळे अमेरिकेला मला भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे मी भावूक झालो होतो, असेही युवराज म्हणाला. कँसरबाबत समजल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. पण हे आईला कसे सावरायचे हे मला कळत नव्हते. तीच स्थिती आईचीही होती. पण कँसर म्हणजे मृत्यू नसतो. अशा व्यक्तिंना प्रेरणा देणे गरजेचे असल्याचे युवी म्हणाला.

पुढे वाचा, अजूनही होऊ शकते युवीची विश्वचषकासाठी निवड