आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिक्‍सर किंग युवीने दाखवला पुन्‍हा दम, डीकेची उडाली झोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिक्‍सर किंग युवराज सिंगने टीम इंडियामध्‍ये परतण्‍याची आपली दावेदारी पुन्‍हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे. युवीची बॅट वेस्‍टइंडीज अ विरूद्ध तळपल्‍यानंतर, आता एनकेपी साळवे चॅलेंजर्स ट्रॉफीमध्‍येही ती थांबण्‍याचे नाव घेत नाही.

युवीला चॅम्पियन्‍स ट्रॉफी आणि वेस्‍ट इंडीजविरूद्धच्‍या तिरंगी चषकासाठी टीम इंडियातून बाहेर करण्‍यात आले होते. आता युवी पुन्‍हा एकदा टीम इंडियाची ब्‍ल्‍यू जर्सी घालण्‍यासाठी उतावीळ झाला आहे.

युवराजने एनकेपी साळवे चॅलेंजर्स ट्रॉफीमध्‍ये इंडिया ब्‍ल्‍यूचे नेतृत्‍व करताना 56 चेंडूत 84 धावांची जबरदस्‍त खेळी करताना निवडकर्त्‍यांनी आपली पात्रता दाखवून दिली आहे.

युवीच्‍या या खेळीमुळे टीम इंडियाचा डीके बोस म्‍हणजेच दिनेश कार्तिकची मात्र, चांगलीच झोप उडाली आहे. काय आहे हे प्रकरण जाणण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...