आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj Singh Bought In 16 Cr Rupees In Ipl Auction 8

VIDEO : जाणून घ्‍या, युवराजवर सर्वांत जास्‍त बोली लागण्‍याची कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल ) सोमवारी लिलाव झाला. दिल्‍ली डेअरडेविल्‍सने भारताच्‍या अष्‍टपैलू युवराज सिंगला 16 कोटी रुपयांमध्‍ये खरेदी केले. युवराज आयपीएलच्‍या 7 व्‍या पर्वामध्‍ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) कडून खेळला. मात्र समाधानकारक धावा काढू न शकल्‍याने आरसीबीने युवीला काढून टाकले होते. मात्र, आश्‍चर्यांची बाब म्‍हणजे त्‍याच आरसीबीने आयपीएल 8 मध्‍ये 15.5 कोटी रुपयांर्पंत बोली लावली होती.
गतवर्षी 14 कोटी रुपयांप्रमाणे धावा करु न शकलेल्‍या युवराजला आरसीबीने काढून टाकले होते. मात्र रणजीमध्‍ये युवीने केलेल्‍या ताडताड फलंदाजीमुळे त्‍याला पुन्‍हा संघात घेण्‍यासाठी आरसीबीने 15.5 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती.
विश्‍वचषक 2011 च्‍या अंतीम लढतीमध्‍ये युवराज सिंह
विश्‍वचषकात युवराजला डावलले
भारताच्‍या विश्‍वचषक संघात युवराज सिंगला सहभागी करुन घेतले नाही. मात्र, त्‍यानंतर झालेल्‍या रणजी ट्रॉफीमध्‍ये युवीने सलग तीन शतके लगावली. टी-20 मध्‍ये सहा चेंडूत सहा षटकार ठोकणा-या युवराज सिंगला त्‍यामुळेच जास्‍त मागणी आहे. त्‍याच्‍यावर एवढी महागडी बोली लावल्‍या गेली आहे.
युवराज सिंगवर सर्वांत जास्‍त बोली लावण्‍याची कारणे -
रणजी ट्रॉफीमध्‍ये सलग तीन शतके
युणजी ट्रॉफीमध्‍ये युवीने सलग तीन शतके लगावत आपण फॉर्ममध्‍ये असल्‍याचे दाखवून दिले. त्‍याचाच लाभ त्‍याला आयपीएलच्‍या लिलावात झाला.
पहिले शतक : 07 डिसेंबर, 2014 : हरियाणाविरुध्‍द 130 धावा
दुसरे शतक : 21 डिसेंबर, 2014 : महाराष्ट्रविरुध्‍द 136 धावा
तिसरे शतक : 28 डिसेंबर, 2014 : सौराष्ट्रविरुध्‍द 182 धावा
टी 20 मधील प्रदर्शन
* टी-20 मध्‍ये माहिर : 12 चेंडूत अर्धशतक ठोकण्‍याचा विश्‍व विक्रम
* युवराज सिंगने 2007 च्‍या विश्‍वचषकामध्‍ये इंग्लंडविरुध्‍द स्टुअर्ट ब्रॉर्डच्‍या सहा चेंडूवर सहा षटकार लगावले होते.
* अष्‍टपैलू : आयपीएलमध्‍ये युवराज सिंगने (110), विराट कोहली (88) षटकार लगावले. आणि विकेटसुध्‍दा मिळविल्‍या आहेत.
आयपीएल-2014 मध्‍ये विराटचे प्रदर्शन
विराट कोहली - मॅच : 14, रन 359, हाय स्कोर : 73, अर्धशतक : 2, विकेट : 0
युवराज - मॅच : 14, रन 376, हाय स्कोर : 83, अर्धशतक : 3, विकेट : 5
आयपीएल करिअर
84 मॅच, 1851 रन, 8 अर्धशतके, 110 छटकार, 129 चौकार, 34 विकेट