आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yuvraj Singh Can Still Make It To Indias World Cup Squad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अष्‍टपैलू खेळाडू युवराज सिंगसाठी विश्‍वचषकाचे दरवाजे उघडण्‍याची शक्‍यता !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली – विश्‍वचषक 2015 साठी भारतीय संघामध्‍ये तरुण खेळाडूंवर भर देण्‍यात आला आहे. परंतु रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांच्‍या फिटनेसच्‍या समस्‍येमुळे युवराजसिंगला विश्‍वचषकाचे दरवाजे उघडू शकतात.
निवडकर्त्‍यांनी विश्‍वचषकासाठी निवडलेल्‍या संभाव्‍य 30 खेळाडूतही युवराजसिंगला नाकारले होते. त्‍यामुळे युवराजसिंग नाराज होता. परंतु रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे 7 फेब्रुवारी रोजी होणा-या फिटनेस चाचणीत अनफीट ठरले तर युवराजची शक्‍यता नाकारता येत नाही. कारण युवीने अजुनही विश्‍वचषकात खेळण्‍याची आशा सोडलेली नाही.
2011 च्‍या विश्‍वचषकामध्‍ये युवराजने उत्‍तम प्रदर्शन केले होते. त्‍याला मालिकाविराचा पुरस्‍कारही मिळाला होता. मात्र, यावर्षी निवडसमितीने युवा खेळाडूंवर भर देत युवराज, हरभजन सिंह, वीरेंद्र सेहवाग, जहीर खान आणि गंभीर यांना डावलले होते.