आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj Singh Commented On Anushka Sharma\'s Photo

युवराजने अनुष्काच्या फोटोवर केली कॉमेंट, लिहिले- Oye hoye Rosie bhabhie

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेमप्रकरणाचे किस्से सध्या बरेच गाजत आहेत. विशेष म्हणजे या नात्याची जाणीव असल्याने टीम इंडियाचे सदस्यही अनुष्का यांना वहिनी मानतात. टीम इंडियाचा ऑलराऊंडर युवराजसिंगने अनुष्काच्या एका फोटोवर 'भाभी' असे लिहून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. त्याने अनुष्काने शेअर केलेल्या फोटोवर कॉमेंट लिहिताना म्हटले, की "Oye hoye Rosie bhabhie ! Looking awesome (ओए होए रोजी भाभी! तू खुप सुंदर दिसत आहेस.)
आयपीएलमध्ये दिसले होते

अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांचा अपकमिंग चित्रपट 'बॉम्बे वेलवेट'च्या प्रमोशनसाठी दोघे आयपीएलमध्ये दिसले होते. त्यांनी कॉमेंटरी बॉक्समध्ये नवज्योतसिंग सिद्धूसोबत जोरदार दंगामस्ती केली होती. यावेळी अनुष्काने तिच्या काही गाण्यांवर सिद्धला नाचायलाही भाग पाडले होते.
पुढील स्लाईडवर बघा, विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे फोटो.... तसेच रणवीर आणि अनुष्काची मस्ती...